शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

जिल्ह्यात २१९ पॉझिटिव्ह, ७० व्यक्ती कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:50 IST

शहरी भागात वाढती रुग्णांची संख्या सध्या चिंतेचा विषय असून, प्रशासनाने बाजारपेठेच्या वेळेवर निर्बंध आणले आहे. विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात १८०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १०८, मोहाडी १३, तुमसर २४, पवनी ४३, लाखनी १३, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात दोन असे २१९ रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देवृद्धाचा मृत्यू : कोरोनाबाधितांची संख्या झाली १५ हजार ६२१

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठवडाभरापासून दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, बुधवारी तब्बल २१९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर भंडारा तालुक्यातील एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. सर्वाधिक कोरोना रुग्ण भंडारा तालुक्यात १०८ आढळून आले आहेत. शहरी भागात वाढती रुग्णांची संख्या सध्या चिंतेचा विषय असून, प्रशासनाने बाजारपेठेच्या वेळेवर निर्बंध आणले आहे. विविध उपाययोजना केल्या जात असताना कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात १८०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात १०८, मोहाडी १३, तुमसर २४, पवनी ४३, लाखनी १३, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात दोन असे २१९ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ६५ हजार २०८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी १५ हजार ६२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या, त्यापैकी १३ हजार ९९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. बुधवारी भंडारा तालुक्यातील एका वृद्धाच्या मृत्यूने कोरोना बळींची संख्या ३३२ वर पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आले आहेत. आतापर्यंत ६,६८४ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी ११८०, तुमसर १९९७, पवनी १५८७, लाखनी १६६०, साकोली १८२९ आणि लाखांदूर तालुक्यात ६८४ रुग्ण आढळून आले आहेत.

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२९१ भंडारा जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता १२९१ झाली आहे. त्यात भंडारा तालुक्यात ५८८, मोहाडी ७५, तुमसर १५५, पवनी २५३, लाखनी ११७, साकोली ८३ आणि लाखांदूर तालुक्यातील २० ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे. गत महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या शंभरच्या आत होती. परंतु, आता ही संख्या हजाराच्या वर पोहोचली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या