शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी भरती प्रक्रियेत २१४ उमेदवार अपात्र

By admin | Updated: November 9, 2016 00:54 IST

भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

वनविभागाची भरती प्रक्रिया : १ हजार ६० उमेदवारांनी लावली हजेरी, बोचऱ्या थंडीतही उमेदवारांची गर्दीभंडारा : भंडारा उपवन संरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी सोमवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. काल पहिल्या दिवशी ८४४ उमेदवारांनी हजेरी लावली. तर आज दुसऱ्या दिवशी १०६० उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. यातील २१४ उमेदवारांना अपात्र करण्यात आले असून ८४६ उमेदवार पात्र ठरले आहेत. नागपूर वनवृत्तांतर्गत भंडारा येथील वनपाल या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी नागपूर वनवृत्ताच्या अधिकाऱ्यांनी भंडारा येथील अधिकाऱ्यांकडे १२ हजार नोकरी इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्याची जवाबदारी सोपविली आहे. काल सोमवारपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. येथील गडेगाव लाकूड आगारात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोमवार ते शनिवारपर्यंत चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी प्रत्येक दिवसाकरिता दोन हजार उमेदवारांना बोलाविण्यात येत आहे. काल पहिल्या दिवशी केवळ ८४४ उमेदवारांनी हजेरी लावली तर आज मंगळवारी दुसऱ्या दिवशी दोन हजारांपैकी केवळ १ हजार ६० उमेदवारांनी शारीरिक चाचणी घेण्यासाठी हजेरी लावली. ९४० उमेदवारांनी या प्रक्रियेकडे पाठ दाखविली आहे. पहाटेपासून सुरु झालेल्या या प्रक्रियेत पुरुष उमेदवारांची उंची, वजन व छाती तर स्त्री उमेदवारांची उंची व वजन अशी शारीरिक चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत खरे उतरणाऱ्या उमेदवारांची पात्र म्हणून निवड होत आहे. आज दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला १ हजार ६० उमेदवारांनी हजेरी लावली. यात ८१९ पुरुष तर २४१ स्त्री उमेदवारांची उपस्थिती होती. त्यापैकी ८४६ उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीतून करण्यात आली. त्यामुळे २१४ उमेदवार यात अपात्र ठरले आहेत. ४४६ पात्र उमेदवारांमध्ये ६४५ पुरुष तर २०४ स्त्री उमेदवारांचा समावेश असून १७४ पुरुष अपात्र ठरले असून ४० स्त्री उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांना पुढील प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे.आज दुसऱ्या दिवशीही सहा टेबलवरूनच दिवसभर ही शारीरिक चाचणी प्रक्रिया राबविण्यात आली. उद्या तिसऱ्या दिवशीही दोन हजार उमेदवारांना उपस्थित राहण्याचे पत्र पोहचता केले आहे. भंडारा उपवन संरक्षक कार्यालयाचे वन कर्मचारी ही प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी प्रयत्नरत आहेत. वन विभागाने या भरती प्रक्रियेची जबाबदारी येथील वनकर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. या सोबतच उमेदवारांची शारीरिक चाचणी पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे तज्ज्ञ अधिकारी बोलाविले आहेत. त्यांच्या सोबतच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारीही भरती प्रक्रियेसाठी आलेल्या स्त्री व पुरुष उमेदवारांची चाचणी घेत आहेत. अगदी पहाटेपासून डोळ्यात अंजन घालून वनविभागाचे कर्मचारी विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबवित आहेत. सध्या कडाक्याची थंडी वाढली असतानाही नोकरीच्या आशेने दूरवरून उमेदवार भंडारा शहरात रात्रीच दाखल होत आहेत. (शहर प्रतिनिधी)