शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांचे अग्निशमन वाहन ३० लाखांच्या घरात कैद

By admin | Updated: March 31, 2016 00:52 IST

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला ...

पवनी येथील प्रकार : चालकाविना वाहन पडूनअशोक पारधी  पवनी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयतर्फे महाराष्ट्र अग्निशमन अग्निसुरक्षा अभियानांतर्गत सन २०१३ मध्ये नगर परिषदेला रु. २० लाख किमतीचे अग्निशमन वाहन घेण्यासाठी निधी उपलब्ध झाला. त्याअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी करण्यात आले. मागील साडेतीन वर्षापासून वाहन चालकाशिवाय वाहन ३० लाखाच्या इमारतीमध्ये कैद करून ठेवलेले आहे.नोकर भरतीचे अधिकार पालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे वाहनचालकाची भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येत असल्याने वाहनचालक उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी अग्निशमन वाहनांची सेवा पवनीकरांना तसेच तालुकावासीयांना मिळू शकली नाही. उन तापू लागले आहे. उन्हाळा सुरु झाला म्हणजे दरवर्षी दुर्दैवाने घरांना आग लागण्याचे प्रकार सुरु होतात. अशावेळी तालुक्यातील प्रभावित जनतेला भंडारा किंवा उमरेड येथील अग्निशमन सेवेवर अवलंबून राहावे लागते. किमान १ ते दीड तास उशिराने वाहन घटनास्थळी पोहचत असते. तेव्हापर्यंत लोकांनी कितीही प्रयत्न केला. तरी खुप मोठे नुकसान झालेले असते. अशावेळी पवनी नगर परिषदेत कैद असलेल्या अग्निशमन वाहनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.अग्निशमन वाहन चालक प्रशिक्षीत असावा लागतो. ऐरवी ट्रॅक्टर चालविणारे चालक अग्निशमन वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाकडे उपलब्ध वाहन चालक अग्निशमन वाहन चालविणे व हाताळणे हे काम करण्यास असमर्थ आहेत. चालक नव्हते त्यामुळे हे वाहन फिल्टर प्लँट शेजारी उघड्यावर दोन वर्षे उभे राहिले. शेवटी वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ३० लाख रूपये खर्च करून गौतम वॉर्डात इमारत उभी करण्यात आली. या इमारतीमध्ये एक वर्षापासून अग्निशमन वाहन कैद करून ठेवण्यात आलेले आहे. वापरात नसल्याने वाहनाचे बॅटरीसारखे अनेक भाग निकामी झालेले राहतील म्हणजे पुन्हा वाहनावर खर्च करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येईल.पालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षक, तारतंत्री व वाहनचालक कम आॅपरेटर (अग्निशमन वाहन) अशी पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती भंडारा यांचेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. जेव्हापर्यंत वाहनचालक नियुक्त होणार नाही तेव्हापर्यंत अग्निशमन वाहनास कारावासाची शिक्षा आहे असे समजण्यास हरकत नाही. वाहनाचा कारावास संपण्याचे अधिकार जिल्हास्तरावर राखून ठेवल्याचे बोलल्या जात आहे.