समितीने केली निवड : अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार लाभइंद्रपाल कटकवार भंडाराअल्पभुधारक शेतकऱ्यांंना सिंचन सुविधांचा लाभ मिळत नसल्याने पिकांचे उत्पादनही योग्य प्रमाणात मिळत नाही. आधार म्हणून अशा अल्प भुधारक शेतकऱ्यांना कृषी सोलर पंपांचा आधार लाभणार आहे. यात शेतकऱ्यांची निवड मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती करणार आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात का असेना शेतकऱ्यांना सिंचनाचे बळ मिळणार आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी ‘महाराष्ट्र सोलर अॅग्रीकल्चर प्रोजेक्ट’ अंतर्गत ही योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यात २००० पैकी १९५ कृषी सोलर पंपांचे वाटप भंडारा जिल्ह्यात करण्यात येणार आहे. ही समिती सर्वेक्षण करण्यात आलेल्या व यादीत नाव आलेल्या अल्पभुधारक शेतकऱ्यांची इंत्थ्यभूत माहिती संकलित करून निकषानुसार व आवश्यकतेनुसार पंप वितरीत करणार आहे. राज्य वीज वितरण कंपनीने अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी योजना अंमलात आणली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलास सिंचन सुविधा निर्माण होण्यास भर होईल.- अनिल गेडामकार्यकारी अभियंता (प्रशासन)वीज वितरण कंपनी भंडारा.
१९५ सोलर पंप जिल्ह्यात सुरू होणार
By admin | Updated: August 18, 2015 00:37 IST