शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरबीच्या विदर्भ सहकारी पतसंस्थेत १९ लाखांचा अपहार

By admin | Updated: February 2, 2017 00:21 IST

खरबी येथील दि विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेत नित्यनिधी ठेवची अफरातफर करण्यात आली.

व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल : लेखा परीक्षक सुपे यांची तक्रारभंडारा : खरबी येथील दि विदर्भ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेत नित्यनिधी ठेवची अफरातफर करण्यात आली. १८ लाख ८९ हजार ८९० रुपयांची अफरातफर झाल्याची बाब अंकेक्षण अहवालात स्पष्ट झाल्याने लेखा परिक्षक श्रीकांम सुपे यांच्या तक्रारीवरून पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक खेमदेव देशमुख यांच्याविरुध्द जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खरबीच्या या संस्थेने ग्राहकांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून नित्यनिधी ठेव व बचत खात्यात पैसे जमा केले. या व्यवहारात पत संस्थेने शेकडो ग्राहकांकडून जमा केलेल्या रक्कमेत मोठी अफरातफर केल्याचा आरोप यापूर्वी अनेकांनी तक्रारीतून केला होता. या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक क्षिरसागर यांनी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ श्रीकांत सुपे यांना फेरअंकेक्षण व चाचणी लेखापरिक्षण करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार श्रीकांत सुपे यांनी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद यांची चौकशी केली. फेर अंकेक्षण सन २०११ ते २०१५ या तर चाचणी लेखापरिक्षण २००२ ते २०११ या वित्तीय वर्षातील करण्यात आले. यात नित्तनिधी ठेव अंतर्गत बचत अभिकर्त्यांच्या माध्यमातून खातेदारांकडून गोळा केलेली रक्कम संस्थेच्या मुख्य किर्दबुकला (कॅशबुक) केली नाही. या कारनाने संस्थेच्या व्यवहारातही ही रक्कम नमूद करण्यात आली नाही. या अंकेक्षण अहवालात पतसंस्थेचे व्यवस्थापक खेमदेव देशमुख हे जबाबदार असून त्यांनी १८ लाख ८९ हजार ८९० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी श्रीकांत सुपे यांनी आज जवाहरनगर पोलिसात खेमदेव देशमुख यांच्या विरोधात ग्राहकांच्या पैशांची अपहार केल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणाने पतसंस्था प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून आणखी काही माशे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)