शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१९ शेतकऱ्यांना अपघात विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: January 24, 2017 00:28 IST

शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो.

९२ प्रकरणांचा समावेश : जनजागृतीचा फटकाइंद्रपाल कटकवार भंडाराशेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जातो. मात्र जनजागृती अभावी यावर्षी फक्त ९२ पैकी १९ प्रकरणांनाच मंजुरी मिळाली आहे. राज्यशासनाने मागील वर्षीपासून शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली आहे. यात शेतकरी म्हणून महसुल कागदपत्रे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना तसेच वयोगट १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. मात्र याचा लाभ क्वचितच शेतकऱ्यांना मिळत असतो. यात रस्ता, रेल्वे अपघात, बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरुन पडणे, सर्पदंश, खून, जनावरांचा हल्ला, दंगल व इतर अपघातात मृत्यू पावल्यास अथवा दोन डोळे, दोन्ही अवयव निकामी झाल्यास अथवा शारीरिक व्याधी निर्माण झाल्यास २ लक्षपासून १ लाखांपर्यंत मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. जिल्ह्यात लहान सहान घटना शेतकऱ्यांसोबत घडत असतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता, अपघात विमा योजनेची प्रस्तावांची संख्या लक्षात घेता मंजूर झालेली प्रकरणे अल्प आहेत. यासंदर्भात शासनाने जनजागृतीवर भर देवून शेतकऱ्यांना विमा योजनेबाबद जागृत करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत प्रस्तावाला अंतिम रुप दिल्यानंतर धोरणानुसार एका खाजगी विमा कंपनीमार्फत लाभ दिला जातो.ही योजना शेतकरी कुटूंबीयांसाठी अत्यंत फायद्याची आहे. शासनामार्फत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. शेतकरी केव्हाही या योजनेची माहिती जिल्हाअधीक्षक कृषी कार्यालय अथवा तालुका कृषी कार्यालयातून प्राप्त करु शकतात.-डॉ. नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भंडारा