शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी संस्थांची १८.५० लाखांची 'लिज' माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:01 IST

मागील वर्षीच्या पावसाळयात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील तलावात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे मासेमारी सहकारी संस्थांना अपेक्षित मत्स्यव्यवसाय झाला नाही.

ठळक मुद्देरमेश डोंगरे यांची माहिती : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत निर्णय, मासेमार बांधवांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील वर्षीच्या पावसाळयात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील तलावात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे मासेमारी सहकारी संस्थांना अपेक्षित मत्स्यव्यवसाय झाला नाही. या कारणाने 'लिज'ची रक्कम माफ करण्याची मागणी संस्थांनी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन १३ जून २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेने सर्वानुमते ही 'लिज' माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४ लाख ८ हजार ७०० आहे व सरासरी पर्ज्यन्यमान १ हजार ३३० मी. मी. असून जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव १,१५४ , लघु सिंचन तलाव १४४ व पाझर तलाव १५ असे एकूण १,३१३ तलाव आहेत. या सर्व तलावात भंडारा जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय करण्यात येतो व मत्स्य व्यवसाय करणारे समाज बांधवांचा मासेमारी हा मुख्यत: उपजिविकेचा व्यवसाय आहे.कृषि विभागाच्या अहवालानुसार मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पाऊस झालेला आहे. अल्पवृष्टीमुळे जिल्ह्यातील कोणतेही तलाव पूर्णपणे भरलेले नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे समाज बांधव व त्यांचे सहकारी संस्थांच्या उत्पादनात वाढ होऊ शकली नाही. या दरम्यान मत्स्य व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवांना व त्यांचे संस्थांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे त्यांनी जुलै २०१७ ते ३० जून २०१८ पर्यंत १८.५० लिज माफ करण्याकरीता मागणी केली.त्यानुसार सदर विषयाची तात्काळ दखल घेवून सदर विषय १३ जून २०१८ च्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला. मत्स्य व्यवसाय सभापती व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांचे संमतीने विषय मंजूर करुन रक्कम रुपये १८.५० लक्ष रुपयांची लिज माफ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिली. या निर्णयामुळे मासेमारांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार