शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

१८५ पदे रिक्त ; आरोग्य विभाग खिळखिळे

By admin | Updated: December 13, 2014 00:56 IST

सार्वजनिक आरोग्याची सर्वांगीण हमी घेणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अंबार आहे.

इंद्रपाल कटकवार भंडाराभंडारा : सार्वजनिक आरोग्याची सर्वांगीण हमी घेणाऱ्या जिल्हा आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अंबार आहे. परिणामी त्याचा सरळ फटका रूग्ण सेवेवर होत आहे. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागासह सामाण्य रूग्णालय प्रशासनातील एकूण १८५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. विशेषत: तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदांची संख्या जास्त असल्याने समस्येने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. आरोग्य सेवेचा कणा असलेल्या कर्मचारी पदांचा अनुशेष कायम आहे. जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग १ ची तीन पदे रिक्त आहेत. यात अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दोन तर जिल्हा लस टोचणी अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. वर्ग दोन मधील प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांचे प्रत्येकी एक पद तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे तीन पद, वैद्यकीय अधिकारी गट (अ) मधील पाच पदे तर गट (ब) मधील एक पद रिक्त आहेत. यात राज्य स्तरावरील रिक्त पदे भरण्याची कारवाई सरळ शासनामार्फत करण्यात येते. मात्र मागील चार वर्षांपासून या आकड्यांमध्य फार मोठी घट झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती स्तरावरील सात आरोग्य केंद्रांचा कारभार बघितला जातो. यात तांत्रिक कर्मचाऱ्यांची एकूण १४ तर अतांत्रिक कर्मचाऱ्यांची एकूण ३० पदे रिक्त आहेत. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक (स्त्री), आरोग्य पर्यवेक्षक (पंचायत स्तर), कनिष्ठ सहायक, परिचर, अंशकालिन स्त्री परिचरांच्साी पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकूण ५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी ४७ पदे भरलेली असून ९ पदे रिक्त आहेत. सामाण्य रूग्णालय प्रशासनाच्या अधिनस्थ जिल्हा सामाण्य रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयचा डोलारा आहे. ग्रामीण केंद्रातील व तिन्ही रुग्णालयातील कारभार सांभाळायला मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची गरज आहे. रिक्त पदांचा अनुशेष कायम आहे. वर्ग १ ची सात पदे, वर्ग २ ची ३ पदे, वर्ग ३ ची २६ पदे तर वर्ग ४ ची ८० पदे रिक्त आहे.