शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

जिल्ह्यातील १.८५ लाख निराधारांना ‘डीबीटी’द्वारे मिळणार थेट अनुदान

By युवराज गोमास | Updated: May 25, 2024 18:24 IST

कागदपत्रांसाठी ३० मेपर्यंतची डेडलाइन : अन्यथा अनुदान होणार बंद

भंडारा : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ६४७ पात्र निराधारांना दिलासा मिळतो आहे. त्यांना जगण्याचे आर्थिक बळ लाभत आहे; मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी डीबीटी पोर्टल प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठी व तहसील कार्यालयात जमा करण्याची ३० मे ही डेडलाइन आहे. वेळेत कागदपत्रे जमा न करणाऱ्यांचे अनुदान बंद होणार आहे.

शासनाच्या विशेष साहाय्य कार्यक्रमाअंर्तगत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपयांचे अदा अनुदान दिले जाते. यापूर्वी योजनांच्या लाभार्थ्यांना मासिक १,००० रुपयांचे अनुदान दिले जात होते. गतवर्षी अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही मदत लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवण्यात येते. बँकेमार्फत मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, आता शासनामार्फत सदर अर्थसाहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून निराधारांच्या थेट खात्यात वर्ग केले जाणार आहे. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जात होता.

प्रशासनाचे लाभार्थ्यांना आवाहन

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे अनुदान आता ‘डीबीटी’मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, अपडेट आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे पाठवण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांचे दरमहा मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड व मोबाइल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या तलाठ्यांना सूचना

निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील संजय गांधी योजना विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत तहसीलस्तरावरून गावस्तरावरील तलाठ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ३० मेपर्यंत कागदपत्रे संजय गांधी योजनेच्या कक्षात जमा करावी लागणार आहेत.

जिल्ह्यातील योजनानिहाय लाभार्थी संख्या

संजय गांधी योजना :सर्वसाधारण लाभार्थी - ३८३२५अनुसूचित जाती - ८८२०अनुसूचित जमाती - २०६६

इंदिरा गांधी योजना :इंदिरा गांधी वृद्धापकाळ - ३८९१२इंदिरा गांधी विधवा - ६२४२इंदिरा गांधी दिव्यांग - १९६

श्रावणबाळ योजना :सर्वसाधारण - ७११८८अनुसूचित जाती ९१३५अनुसूचित जमाती - २०५३

"निराधार लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट अनुदानाचे वितरण होणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लाभार्थी याद्याही तलाठ्यांकडे सादर करण्यात आल्या आहेत."- सुरेश वाघचौरे, तहसीलदार, मोहाडी.

टॅग्स :bhandara-acभंडारा