शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

१.८४ लाख मजुरांना मिळाला रोजगार

By admin | Updated: May 12, 2017 01:46 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दिड महिन्यात भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ८४ हजार ४८८ मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

८७ हजार ८१२ कुटुंबाची नोंद : १४ कोटींची मजुरी वाटप, रोजगार हमी योजना इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दिड महिन्यात भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ८४ हजार ४८८ मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मजुरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मजुरांना रोजगार मिळणे ही बाब उत्तम असली तरी यात बहुतांश शेतकरी रोहयाच्या कामावर असल्याचे समजते. उन्हाळी धान हंगाम अंतीम टप्यात असतांनाच जिल्ह्यातील मजूरांना कामे उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत या मजुरांकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याची मागणी सातत्याने होत असते. प्रशासनाकडूनही संबंधित मजुरांकडून विशेषत: ग्रामपंचायतीकडून मजुरांचे जॉबकार्ड मागविले जातात. या आधारावर सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात रोजगार हमी योजनेंतर्गत २ लक्ष ६ हजार ०३१ कुटूंबानी नोंदणीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ५ लक्ष ७१ हजार २२१ मजुरांची नोंदणी करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षरित्या कामावर ८७ हजार ८१२ कुटूंबापैकी १ लक्ष ८४ हजार ४८८ मजूर कामावर आहेत. विशेष म्हणजे कामावर असलेल्या या उपरोक्त मजुरांना मजुरीपोटी १४ कोटी ८ लक्ष रुपये अदा करण्यात आले आहे. सर्व मजुरांची मजूरी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. या प्रणालीत आधार कार्डाची भूमिका महत्वाची आहे. एखाद्या मजुराने कार्य केल्यानंतर १५ दिवसाच्या आत मजुरी मिळने गरजेचे आहे. मजुरांनी काम केलेल्या व प्रशासनाने त्यांची मजूरी दिल्याची टक्केवारी ९५.६१ इतकी आहे. मागीलवर्षी २.७५ लाख मजूर कामावर रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २ लक्ष ५ हजार ७७५ कुटूंबानी कामासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लक्ष ७८ हजार २६९ मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. शासनाने मजुरी पोटी ७४ कोटी ६९ लक्ष ३९ हजार रुपये वाटप केले होते. त्या सत्रात ५५ लक्ष १४ हजार ५४ इतके मनुष्यदिवस कामावर हजर असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्याची व यशस्वी करण्याची खरी जबाबदारी कंत्राटी कर्मचारी सांभाळीत आहेत.