शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मौखिक आरोग्य तपासणीत आढळले १८ कर्करुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:44 IST

तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला.

ठळक मुद्दे४.५१ लाख नागरिकांची तपासणी : आरोग्य विभागाचा पुढाकार

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : तंबाखुमुळे कर्करोग होतो ही बाब सर्वंश्रृत असली तरी तंबाखू खाण्याचे प्रमाण दिवसेंगणिक वाढत आहे. याचाच प्रत्यय राज्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणीत आला. भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मौखिक तपासणी मोहिमेत १८ कर्करुग्ण आढळून आले आहेत.राज्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत नागरिकांची मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात ४ लक्ष ५१ हजार ८९३ नागरिकांचा यात सहभाग होता. जिल्ह्यातील ७५ हजार ६४५ नागरिकांनी स्वत:हून तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करून घेतली.तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी नागरिकांपर्यंत जाऊन ३ लक्ष ७६ हजार २४८ नागरिकांची तपासणी केली. यात ४८ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले. शासनाने असंसर्गीय आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही विशेष मोहिम हाती घेतली होती. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नियोजन सुरु होते.अशी आहे व्यसनाधीन व्यक्तींची संख्याच्तपासणी अंतर्गत मद्यप्राशन करणारे ५९ हजार ९८८ लोकांची संख्या आहे. तसेच तंबाखू खाणारे १ लक्ष ६९ हजार ६३ व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. या अंतर्गत तंबाखू खाण्यामुळे तोंड न उघडता येणाºया व्यक्तींची संख्या ७ हजार ३५९, पांढरा लाल चट्टा असलेले १ हजार ७८०, जाडसर त्वचा असलेले ८०६ तर १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत चट्टा बरा न झालेल्या इसमांची संख्या ४६१ आहे. विशेष म्हणजे मुखाची स्वच्छता राखणाºया व्यक्तींची संख्या २ लक्ष ९५ हजार ६८८ असून अस्वच्छता ठेवणाºया व्यक्तींची संख्या १ लक्ष २२ हजार ३४६ आहे.चार वर्षात वाढले रुग्णच्मागील चार वर्षात कर्करोगाने पीडित रुग्णांची संख्या १४ हून वाढून २३४ पर्यंत आली आहे. यात तोंडाच्या कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये १९ महिला तर ७९ पुरुषांचा समावेश आहे. सन २०१४ मध्ये १४ कर्करुग्ण होते. सन २०१५ मध्ये ६५ तर २०१६ मध्ये ६२ कर्करुग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण २०१७ मध्ये म्हणजेच ९३ इतके कर्करुग्ण आहेत. यात तोंडाचा कर्करुग्ण असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.तंबाखू सेवनापासून कर्करोग होतो, ही बाब माहित असतानाही सेवन करीत असलेल्या लोकांना या पासून परावृत्त करणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाच्या वतीने रुग्णालयात नि:शुल्क आरोग्य कर्करोग शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे.-डॉ.मनिष बत्रा,दंतरोग चिकित्सक सामान्य रुग्णालय भंडारा.