शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणारी १८ जनावरे पकडली

By admin | Updated: October 17, 2016 00:32 IST

आंधळगाव पोलिसांनी रात्रपाळीत नाकाबंदी दरम्यान जांब खैरलांजी फाट्यावर दोन बोलेरो पिक गाड्या पकडून ...

तीन जनावरांचा मृत्यू : एक लाखांचा मुद्देमाल जप्त, आंधळगाव पोलिसांची कारवाईआंधळगाव : आंधळगाव पोलिसांनी रात्रपाळीत नाकाबंदी दरम्यान जांब खैरलांजी फाट्यावर दोन बोलेरो पिक गाड्या पकडून त्यात डांबून नेत असलेल्या १८ जनावरांना गाड्यासहीत जप्त केले.आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार के.बी. उईके यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई प्रशि. पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पो. नि. रविंद्र म्हैसकर, पो. शिपाई लोकेश शिंगाडे, नंदेश्वर धुर्वे यांनी ही कारवाई केली. तुमसर-रामटेक मार्गावरुन १४ आॅक्टोंबरच्या पहाटे बोलेरो पिक गाडी क्र. एम एच ३५ के ४४५३ व एम एच ३५ के ४१०२ ह्या दोन गाड्या भरधाव वेगाने जात होत्या. आंधळगाव पोलिसांना संशय येताच त्यांना थांबवून चौकशी केली. त्यात १८ जनावरे डांबून कत्तलखाना कामठी येथे नेत असल्याचे सिध्द झाले. सदर गाड्या आंधळगाव पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावर पशुवैद्यकिय अधिकारी सरदार, चौधरी, डाभरे यांनी तपासणी केली. त्यात तीन जनावरे मृतावस्थेत आढळली. उरलेल्या जनावरांना औषधोपचार करुन गौशालेत पाठविण्यात आले. ही घटना जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने मोठी गर्दी करुन जनावरांना पाणी व चाऱ्याची उपलब्धता करुन दिली. यात सोनु मेहर, राम कांबळे, अजय गायधने, श्याम कांबळे, शेखर वैद्य, रवी पाठक यांनी मदत केली यातील आरोपी नौशाम मो. पठाण, मो. शफी कुरेशी, शेख सलमान शेख बसीर, सर्व रा. कामठी जि. नागपूर यांना अटक करुन कलम २७९, ३४, ४२९ भादंवी कलम ११(१)(घ), १९६० नुसार प्राणी निर्दयतेने वागविणे व कलम ९ महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अ १९९५ नुसार १३९/१७७-३/१८१, २३९ एमएम सीआर १७७ मोटर व्हेईकल नुसार अटक केली आहे. तपास ठाणेदार के. बी. उईके व त्यांचे सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)