शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

१.७७ लाख हेक्टरमध्ये होणार धान लागवड

By admin | Updated: June 3, 2015 00:48 IST

येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक लागवडीच्या दृष्टीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ...

भंडारा : येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. पीक लागवडीच्या दृष्टीने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ७७ हजार २९३ हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून जिल्ह्यासाठी ६७ हजार ३०० मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर करण्यात आला आहे.भाताचे कोठार म्हणून सर्वश्रूत असलेल्या भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. वरूणराजाने दडी मारल्याने अनेकांची पऱ्हे करपून तर काहींनी रोवणी पाण्याअभावी हातून गेली. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांच्या शेतीत धानाचे उत्पादन झाले नसल्याने शेती पडीक राहली.जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधिक्षक कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी खरीप व रब्बी पिकांचा अहवाल शासनाकडे सादर करतो. यावर्षी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्रापैकी १ लाख ७७ हजार २९३ हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यासोबतच तूर, सोयाबीन, ऊस व अन्य पिकांची लागवड करण्यात येणार आहे. तूर पिकाची ८ हजार २५४ हेक्टर क्षेत्रात लागवड होणार असून सोयाबीनची ८ हजार ३३० क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. यावर मात करता यावी, म्हणून खरीप हंगामात अनेकांनी भात पिकांऐवजी नगदी पीक म्हणून ऊस पिकाची लागवड करण्याचे ठरविले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस पीक सुमारे ४ हजार हेक्टरमध्ये वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भात पिकासाठी ३८ हजार ५८६ क्ंिवटल बियाणांची गरज असून महाबीजकडे १३ हजार ५०० क्ंिवटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तूर पिकासाठी ४५० क्ंिवटलची आवश्यकता असून महाबीजकडे २७० क्ंिवटलची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनची ८ हजार ३३० हेक्टरमध्ये पेरणी होणार असून त्यासाठी ५ हजार ४७२ क्ंिवटलची आवश्यक असून त्यापैकी ३ हजार २८२ क्ंिवटल बियाणांची महाबीजकडे मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)खताच्या लिंकिंग रोखण्यावर भरजिल्ह्यात खताची लिंकिंग तसेच परप्रांतात खताची विक्री होणार नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषिनिविष्ठा संनियंत्रण स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खते, बियाणे निरीक्षकांनी सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. भरारी पथक व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.