१८ पासून परीक्षा दहावीचे २२,२६१ परीक्षार्थीइंद्रपाल कटकवार भंडाराउच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी ५७ केंद्रावर एकूण १७ हजार २०९ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी दक्षता समितीसह भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असली गैरमार्गाशी लढा देणारे भयमुक्त वातावरणावरच चिंता व्यक्त केली जात आहे. हे पथक परीक्षेदरम्यान केंद्रांवर होणाऱ्या कॉपी व अनुचित प्रकारावर करडीनजर ठेवणार आहेत. विभागिय शिक्षण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभाग बारावीच्या परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किसन शेंडे म्हणाले, मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा बारावीची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तथा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार थांबविण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरपर्यत प्रतिबंधीत क्षेत्र व या क्षेत्रात संचालित झेराक्स केंद्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहे. भरारी पथकात शिक्षणाधिकारी, महसूल विभागाचे प्रमुख, संबंधित तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. परीक्षेच्या तयारीसंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. काही परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.५७ केंद्रावर होणार परीक्षाभंडारा जिल्ह्यात बारावीची परीक्षा एकूण ५७ केंद्रांवर होत आहे. यावर्षी १७,२०९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात नियमित तथा पुनर्परीक्षार्थीचा समावेश आहे. दहावीची परीक्षा १ मार्चपासून ८७ केंद्रातून २२ हजार २६१ विद्यार्थी देणार असून मंडळाकडून परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.संवेदनशील केंद्र नाहीभंडारा जिल्ह्यातील कॉपी बहाद्दरांचा रिकॉर्ड पाहता बोर्डातर्फे अशा परीक्षा केंद्रांचा समावेश संवेदनशील केंद्रात करण्यात येत होता. मात्र यावर्षी शिक्षण मंडळाने कोणतेही केंद्र संवेदनशील नाही, असे सांगितले. म्हणजेच प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेऊन कॉपी होणार नाही, याची पूर्वसूचना दिल्याचे म्हटले जात आहे. कॉपी बहाद्दरांचा कलंक पुसण्यासाठी ही धडपड आहे, की अन्य बाबीसाठी हे लवकर कळेलच.
१७,२०९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 00:31 IST