शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी शिक्षिकेची १७ वर्षांपासून पायपीट

By admin | Updated: August 26, 2014 23:39 IST

पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शिक्षिका उषा रामंचंद्र कुंभारे यांना शाळा व्यवस्थापनाने सेवामुक्त केले. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात दाद मागितली. यात न्यायालयाने कुंभारे यांना

भंडारा : पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शिक्षिका उषा रामंचंद्र कुंभारे यांना शाळा व्यवस्थापनाने सेवामुक्त केले. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात दाद मागितली. यात न्यायालयाने कुंभारे यांना शाळेत पूर्ववत रुजू करण्याचे आदेश दिले, मात्र शाळा सचिवाने त्यांना रुजू न केल्याने त्या मागील १७ वर्षांपासून न्यायासाठी पायपीट करीत आहे.उषा कुंभारे ह्या १९९४ मध्ये पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात सहायक शिक्षिका या पदावर रुजू झाल्या होत्या. १४ आॅगस्ट १९९६ ला संस्थेनी त्यांना नाहक सेवामुक्त केले. संस्थेच्या या सेवामुक्तीच्या आदेशाविरूध्द कुंभारे यांनी शाळा न्यायधिकरणाकडे आव्हाण दिले. १७ वर्षानंतर निकाल कुंभारे यांच्या बाजूने देताना सेवामुक्तीचा आदेश रद्दबातल ठरवून त्यांना पूर्ववत शाळेत नियुक्त करण्याचे आदेश दिले.या आदेशाविरूध्द शाळा व्यवस्थापन कमिटीने शाळा न्यायधिकरणाच्या विरुध्द स्थगिती मागितली. मात्र उच्च न्यायालयाने शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देण्याचे नाकारून स्थगनादेश फेटाळून लावला. न्यायालयीन निर्णयाचे आदेश घेऊन कुंभारे ह्या शाळेत रुजू होण्यासाठी गेल्या होत्या. मात्र मुख्याध्यापिका कचरा खोबरागडे व संस्था सचिव राहुल गजभिये यांनी सेवेत रुजू करण्यास नकार दिला. याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशासह शाळेची तक्रार केली. यावरून शिक्षणाधिकारी यांनी शाळेला रुजू करण्याचे आदेश दिले. तरीही शाळा व्यवस्थापन कमिटीने कुंभारे यांना सेवेत सामावून घेतले नसून शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाही धुडकावून लावल्याचा आरोप उषा कुंभारे यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)