शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १,६६३ धार्मिकस्थळे अनधिकृत!

By admin | Updated: April 28, 2016 00:22 IST

भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक अथवा सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी सुरू आहे.

तीन श्रेणीत करणार विभागणी : स्थानांतरण, नियमितीकरणाचा प्रस्ताव विचाराधीनभंडारा : भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक अथवा सरकारी जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने गठित केलेल्या समितीने गृह विभागाच्या निर्णयाचा हवाला देऊन १ मे १९६० ते २९ सप्टेंबर २००९ पर्यंत अस्तित्वात असलेले अनधिकृत धार्मिक स्थळांचे तीन वर्गात सूची तयार केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या १,६६३ इतकी आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांच्या माहितीसाठी १६ एप्रिलपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. सर्वेक्षणानंतर कृती आराखडा महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातंर्गत सार्वजनिक किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून २९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेले अनधिकृत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, निष्कासन आणि स्थलांतरणासाठी जिल्हास्तरीय समितीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात अनधिकृत १,६६३ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली. यासाठी शहरी क्षेत्रातील नगरपालिका आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीकडून सर्वेक्षण करण्यात आले. पोलीस प्रशासनाशी चर्चा करून १,६६३ धार्मिक स्थळांची यादी जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात आली. त्याची पडताळणी करून समितीने त्या सर्व धार्मिक स्थळांना ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्यात आले. ‘अ’ श्रेणीतील धार्मिक स्थळांचे नियमितीकरण, ‘ब’ श्रेणीतील निष्कासन आणि ‘क’ श्रेणीतील स्थळांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यासंबंधी १६ मार्च रोजी अधिसूचना काढून १६ एप्रिलपर्यंत आक्षेप मागविले होते.पवनीतील गरूड खांंब हटविणार !जिल्ह्यात निष्कासन योग्य धार्मिक स्थळांची ‘ब’ श्रेणीतील संख्या आठ आहे. यात चार मंदिर, दोन दरगाह आणि दोन पुतळ्यांचा समावेश आहे. यात राष्ट्रीय महामार्गाच्या काठावर आणि महामार्ग विस्तारीकरणासाठी धार्मिक स्थळ हटवावे लागणार आहे. तुमसर तालुक्यातील डोंगरी (बुज), राजापूर आणि पवनारखारी (हमेशा) येथे एक-एक धार्मिक स्थळ वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आले आहे. ‘क’ श्रेणीतील संख्या २३ असून त्यांच्या स्थलांतरण करण्यात येणार आहे. महामार्ग विस्तारीकरणासाठी जिल्हास्तरीय समितीने स्थलांतरण करण्याचे ठरविले. यात भंडारा शहरातील देशबंधु वॉर्ड, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, खात रोड, वैशाली नगर, हेडगेवार चौक, राजगोपालाचारी वॉर्ड, मिस्किन टँक, तकिया वॉर्ड आणि शास्त्री चौकस्थित १० मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय पवनी येथील चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा, गोडेघाट वॉर्डस्थित मारूती मंदिर आणि विठ्ठल गुजरी वॉर्ड स्थित प्राचीन गरूड खांब या स्थळांचे स्थलांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तुमसर शहरात सरदार वार्ड, विवेकानंद नगर, अभ्यंकर नगर, श्रीराम नगर, आजाद नगर, रविदास नगर आणि गोवर्धन नगरस्थित १० मंदिरांचे स्थालांतरण करण्यात येईल. ‘अ’ श्रेणीतील १,६३२ धार्मिक स्थळांना त्याचठिकाणी नियमित करण्यात येणार आहे.सुनावणीनंतर होणार कारवाईसूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सूचीबद्ध १,६६३ अनधिकृत धार्मिक स्थळ नियमितीकरण, निष्कासन किंवा स्थलांतरणासाठी विचाराधीन आहे. जिल्हास्तरीय समितीने निष्कासन केलेल्या स्थाळांची माहिती राज्य समितीकडे पाठविणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)