शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

कंत्राटदाराने केले १.६६ कोटी रूपये फस्त

By admin | Updated: March 24, 2017 00:29 IST

गोसेबुज स्थित उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचे बांधकाम, यांत्रिकीकरण व विद्युतीकरणाचे १.६६ कोटी रूपयांची देयके

कार्यकारी अभियंत्यांची तक्रार : अड्याळमध्ये गुन्हा दाखल, गोसेबुज उपसा सिंचन योजनेच्या बांधकामाचे साहित्य लंपासभंडारा : गोसेबुज स्थित उपसा सिंचन योजनेच्या पंपगृहाचे बांधकाम, यांत्रिकीकरण व विद्युतीकरणाचे १.६६ कोटी रूपयांची देयके देऊनही कामे पूर्ण न करता कंत्राटदाराने बांधकामाचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कार्यकारी अभियंता प्रदीप कापसे यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे विद्युत ठेकेदार चंद्रशेखर क्रांतीकुमार खराबे (३८) रा.छिंदवाडा रोड, नागपूर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंत्यांची तक्रार आणि पवनी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातंर्गत येणाऱ्या गोसेबुज उपसा सिंचन योजनेचे कंत्राट चंद्रशेखर खराबे यांच्याकडे डिसेंबर २०११ पासून आहे. प्रकल्पाच्या पंपगृहाचे बांधकाम, यांत्रिकीकरण व विद्युुतीकरणाच्या कामाचा त्यांच्याशी करारनामा झालेला होता. त्याअंतर्गत पंपगृहाच्या पूर्ण झालेल्या बांधकामाचे ५३ लाख ९८ हजार २५८ आणि पंपगृहाच्या साहित्यासाठी ९३ लाख १० हजार ४८ रूपये आणि चोरी गेलेल्या साहित्यासह असे एकूण १ कोटी ५६ लाख ३ हजार ९३३ रूपयांची देयके १८ मार्च २०१४ रोजी त्यांना देण्यात आले. याशिवाय वाढीव दरानुसार १० लाख ८२ हजार ७४१ रूपयांचे अतिरिक्त देयके देण्यात आले होते. परंतु आरोपी कंत्राटदार खराबे याने करारनाम्यानुसार देण्यात आलेली कामे पूर्ण केली नाही. या बांधकामासाठी आणण्यात आलेले लाखो रुपयांचे साहित्यही या कंत्राटदाराने वाहनात कोंबून घेऊन गेले. या सर्व बांधकामात कंत्राटदार खराबे याने १ कोटी ६६ लाख ८६ हजार ६७४ रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी गोसेखुर्द प्रकल्पाच्या डावा कालवा वाही विभागचे कार्यकारी अंभियंता प्रदीप कापसे यांची लेखी तक्रार आणि पवनी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशावरून अड्याळ पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर खराबे याच्याविरूद्ध भादंवि ४०६ व ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक डोंगरे हे करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)