शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट विकासासाठी १६ लाखांचा निधी

By admin | Updated: May 29, 2015 00:53 IST

परिसरातील ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करित असलेल्या सिहोरा येथील मंडळ कृषी कार्यालयाला पानलोट योजनेत विकास कार्यासाठी १५ लाख ९६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : परिसरातील ७३ गावांचा प्रशासकीय कारभार करित असलेल्या सिहोरा येथील मंडळ कृषी कार्यालयाला पानलोट योजनेत विकास कार्यासाठी १५ लाख ९६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीअंतर्गत शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.सध्या हरदोली गावात असणाऱ्या सिहोऱ्याच्या मंडळ कृषी कार्याल्याला ७३ गावे जोडण्यात आली आहेत. शेतकरी आणि गावात विकास कार्यातुन न्याय देण्यासाठी शासनाने पानलोट योजना सुरु केली आहे. ही योजना सन २०१३ मध्ये सुरुवात करण्यात आली असून सन २०१९ पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. या कालावधीत विकास कामे करण्यासाठी ५ कोटी ९३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ५ वर्षाच्या कालावधी करीता नियोजनबध्द वार्षिक रित्या कामांना सुरुवात झाली आहे. आधीचे २ वर्ष गावागावात जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजनात निघून गेली आहेत. खऱ्या अर्थाने गावांना न्याय देणाऱ्या वर्षाला सुरुवात झाली आहे. या कार्यालयाने यंदा शासनाला विकास कार्यासाठी ४ टक्के निधीची मागणी केली असता १५ लाख ९५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. १ टक्के निधी कपात करण्यात आली आहे. यात ७ लाख रुपये निधीचा समावेश आहे. येत्या काही दिवसात पहिला टप्पा अंतर्गत विकास कामे घेतली जाणार आहेत. यात प्रेरक, प्रवेश उपक्रम, गाळ उपसणे, बोरवेल्स, हातपंप दुरुस्ती, धोबीघाट, बाह्य खेळांचे साहित्य, तथा अन्य कामे केली जाणार आहेत.तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या शेतात पानलोट योजनेची लाट पोहचणार आहे. यात शेततळे, मनगी, पुर्नजीवन, बचतगट आदींना मदत केली जाणार आहे. या कालावधीत शेतीचे धुरे बांधकाम केली जाणार आहेत. पंरतु या योजनेचे दुर्देव आहे. कोट्यावधी रुपये योजनेवर खर्च केली जात आहेत. निधी खर्चाचे सर्वाधिकार गावातील पानलोट समितीला आहेत. कुशल तथा बांधकाम करणारी कामे होत आहे. पंरतु अस्थाई स्वातंत्र अभियंता नियुक्त नाही. निधी खर्च करताना अंदाजपत्रक तथा मोजमाप पुस्तिका तयार केली जात आहे. तांत्रिक अभियंताचा शोध घेतला जात आहे. यामुळे सध्या भागम्भाग सुरु झाली आहे. या योजनेची अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी आर. एच. उईके यांना संपर्क साधले असता होवू शकला नाही. जीर्ण इमारतीत प्रशासकीय कारभार करित असणाऱ्या मंडळ कृषी कार्यालयाचे स्थानांतरण पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत करण्याचे आश्वासन आ. चरण वाघमारे यांनी दिले होते. परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही प्रक्रिया तथा दोन्ही विभागाचे पत्र व्यवहार सुरु झाले नसल्याने स्थानांतरणाचे प्रयत्न हवेतच विरणार असल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)