शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 11, 2016 00:52 IST

वैयक्तिक विवाहाच्या अतिखर्चीक पद्धतीमुळे समाज बांधव आर्थिक कोंडीत गुदमरू नये, सामाजिक बांधीलकी कायम राहावी.

तेली समाज बांधवांचा उपक्रम : जोडप्यांना दिले गृहोपयोगी साहित्य भेट, मान्यवरांनी दिला शुभाशीर्वादभंडारा : वैयक्तिक विवाहाच्या अतिखर्चीक पद्धतीमुळे समाज बांधव आर्थिक कोंडीत गुदमरू नये, सामाजिक बांधीलकी कायम राहावी. श्रम आणि वेळ वाचावा तसेच समाजाचे संघटन कायम राहावे म्हणून संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ भंडारा अंतर्गत शनिवारला लाल बहादूर शास्त्री विद्यालयात तेली समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण १६ जोडपी विवाहबद्ध झाली. वरांची भव्य मिरवणूक संताजी मंगल कार्यालयापासून मन्रो शाळेपर्यंत डफऱ्या, तुतारी तसेच ढोल ताशांच्या सानिध्यात काढण्यात आली होती. याप्रसंगी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जवळजवळ १० हजार लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सोहळ्यात वर वधूंना भेटवस्तूंचे व नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी वर वधूंच्या पालकांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाकडून प्रती जोडप्यास एक स्टील कपाट, गुरुदेव बर्तन भंडार यांचेकडून पाच भांडी देण्यात आली. भंडारा येथील ड्राय फ्रूटवालाचे संचालक बैस व बिकानेर स्वीट मार्ट यांचेकडून प्रत्येक जोडप्याला ड्राय फ्रूट व मिठाईचे डबे देण्यात आले. आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांचेकडून प्रत्येक वधूस शिलाई मशीन देण्यात आली. सुरेश मस्के यांना महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आल्याबद्दल मंडळाकडून त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळातर्फे विवाह झालेल्या जोडप्यांना शासनाच्या शुभमंगल योजनेअंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. सोहळ्याचे प्रास्ताविक अध्यक्ष अ‍ॅड.धनराज खोब्रागडे यांनी केले.त्यावेळी विवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, भंडाराचे नगराध्यक्ष बाबूराव बागडे तुमसर पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, भंडारा पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, लॉयन्स क्लबचे ज्ञानेश्वर वांदिले, भंडाराभूषण डॉ.लोकनाथ गिऱ्हेपुंजे, प्रशांत कामडे, बळवंत मोरघडे, येनूरकर, उमेंद्र भेलावे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, भगवान बावनकर, अ‍ॅड.विनयमोहन पशिने, भरत खंडाईत, युवराज वासनिक, एकानंद समरीत, शाम वंजारी, सुभाष वाघमारे, जगन्नाथ कापसे, सुनिल साखरवाडे आदी समाजबांधव उपस्थित होते. सदर विवाह सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.धनराज खोब्रागडे, देवीदास लांजेवार, रविशंकर भिवगडे, जीवन भजनकर, पुरुषोत्तम वैद्य, उद्धवराव डोरले, रामदास शहारे, धनराज साठवणे, रामू शहारे, सेवक कारेमोरे, लेखराज साखरवाडे, कल्पना नवखरे, शोभा बावनकर तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे पदाधिकारी सरिता मदनकर, लता खोब्रागडे, कुंदा वैद्य, रंजना भिवगडे, छबू रघुते आदींनी सहकार्य केले. संचालन रविशंकर भिवगडे यांनी तर आभार पुरुषोत्तम वैद्य यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)