शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१५०० चौरस कि.मी.चे वन क्षेत्रफळ धोक्यात

By admin | Updated: August 30, 2014 23:26 IST

वेतन वाढीच्या मुद्यांवरून वनकर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असूनही वन मंत्रालयाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यातील

भंडारा : वेतन वाढीच्या मुद्यांवरून वनकर्मचाऱ्यांचे सोमवारपासून आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असूनही वन मंत्रालयाकडून आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यातील १५१७ चौरस किलोमिटर वनक्षेत्रफळ धोक्यात आले आहे. आंदोलनादरम्यान वृक्षतोड व वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या शिकारी झाल्याचा संशय संपावरील वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.गुरूवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वनकर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप आणखी किती दिवस लांबेल याची शाश्वती नाही. भंडारा जिल्ह्यातील पाचशेच्यावर वनपाल, वनरक्षक व वनकर्मचारी संपात सहभागी झाले आहे. जिल्ह्याचे वनक्षेत्रफळ १५१७ चौरस किलोमिटरचे आहे. यात वनरक्षकाकडे ४०० ते ८०० हेक्टर जंगलाची जबाबदारी आहे. तर वनपालाकडे २ हजार ते २ हजार ५०० हेक्टर जंगलाची जबाबदारी आहे. एका वनपालाकडे ४ ते ५ वनरक्षक कार्यरत आहेत.सहा दिवसापासून वनकर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने ते जंगलाकडे भटकले नाहीत. त्यामुळे वृक्षतोडीसोबतच वन्यप्राण्यांच्या शिकार झाल्याची माहिती संपावरील वनकर्मचाऱ्यानी दिली. भंडारा जिल्ह्यात हरीण, चितर, सांबर यासोबतच तृणभक्षी प्राणीही आहेत. कोका अभयारण्य लागून असल्याने तिथे ६ ते ७ वाघांचा संचार आहे. बिबट ३० ते ४० च्या संख्येत आहे. सहा दिवसांपासून वनकर्मचाऱ्यांच्या संपाची संधी साधून काही व्यक्तींनी जंगलाकडे वक्रदृष्टी केली आहे. त्यांनी वनप्राण्यांना आपली शिकार बनविण्यासाठी जंगलात जाळे पसरविल्याचीही माहिती आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिकाऱ्यांवर कोणाचेही वचक राहिले नाही. संप असाच सुरू राहिल्यास वन व वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)