आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात एमआर लसीकरण राबविण्यात येते. नऊ महिने पूर्ण आणि दीड वर्ष पूर्ण झालेल्या सर्व बालकांना ही लस दिली जाते. त्यामुळे गोवर व रुबेला या दोन्ही रोगांची लागण होण्याचे प्रमाण नगण्य असते. गोवर तसेच रुबेलाचे रुग्ण वयाच्या १५ वर्षांपर्यतही दिसून येतात. हा संसर्गजन्य आजार असून तो हवेतून पसरतो. त्यामुळे संसर्गाची तीव्रता अधिक असते. विशेषत: लहान मुलांना याचा अधिक फटका बसतो. ताप, सर्दी, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी आदी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
असे केले जाते निदान
- ताप, पुरळ, कांजण्या असलेले रुग्ण आढळल्यास त्या गावात सर्वेक्षण करण्यात येते.
-रुग्णांच्या रक्तजलाचे नमुने घेतले जातात. त्यानंतर, ते तपासणीसाठी पाठविल्या जातात. पॉझिटिव्ह अहवाल आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार केल्या जातात.
बॉक्स
१०० टक्के गोवर, रुबेलाचे लसीकरण
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात एमआर लसीकरण राबविण्यात येते. नऊ महिने व दीड वर्ष पूर्ण झालेल्या सर्व बालकांना ही लस दिली जाते. आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका यांच्यातर्फे सर्वेक्षण केल्या जाते. त्यानंतर वय वर्ष पूर्ण झाल्यानंतर लसीकरण करण्यात येते.
...तर डॉक्टरांना दाखवा
मुलांना ताप येत असल्यास आणि अंगावर पुरळ येत असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे. हवामानाच्या बदलाने गोवर संशयित आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी लगतच्या आरोग्य केंद्रांशी संपर्क साधून विचारणा करावी.
कोट
साधारणत: उन्हाळ्याच्या कालावधीत गोवरचे रुग्ण आढळून येतात. नऊ महिने आणि दीड वर्ष पूर्ण झालेल्यांना लसीकरण करण्यात येते. जर अंगावर पुरळ येत असतील किंवा ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येत असल्यास आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.
प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा