शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यासह १५ जणांना अटक

By admin | Updated: July 8, 2017 00:30 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील अधिकृत दारू दुकाने बंद झाल्यामुळे दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात वाढ झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचा छापा : १२ दुचाकी जप्त, शुक्रवारी वॉर्डात कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील अधिकृत दारू दुकाने बंद झाल्यामुळे दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात वाढ झाली आहे. भंडारा शहरातील शुक्रवारी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध दारू विक्रीच्या दुकानात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या कारवाईत १२ दुचाकी जप्त करून दारू विक्रेत्यासह १५ मद्यपींना अटक केली. ही कारवाई गुरूवारला रात्री करण्यात आली.राजेश सुकाजी साकुरे (४५) रा.शुक्रवारी असे दारू विक्रीचे अवैध दुकान चालविणाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या दुकानात दारू पिणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत ३ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या १२ दुचाकी जप्त केले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना पांढराबोडी मार्गावरील राजेश साकुरे हा त्याच्या अंडे व चिवडा विक्रीच्या दुकानात देशी व विदेशी दारू विक्रीसह ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीवरून घुसर यांनी गुरूवारला खातरजमा केली. माहिती खरी असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात सुरेशकुमार घुसर यांनी पथकासह साकुरे यांच्या मालकीच्या दुकानात छापा घातला. छाप्यादरम्यान साकुरे हा त्याचे दुकानात मद्यपींना बसवून अवैधरित्या हातभट्टी दारू व बिअर पुरविताना आढळून आला. पोलिसांच्या छाप्यामुळे मद्यपींना पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेतील पोलिसांच्या नियोजनानुसार पोलिसांनी दुकानदार साकुरे याच्यासह गिरी, मोगरे, मेश्राम, शुक्ला, भोयर, भारती, तलमले, साकुरे, शंभरकर, नंदूरकर, शेंडे, मदनकर, क्षिरसागर, सिंह या १४ मद्यपींना ताब्यात घेतले. या कारवाईत मद्यपींच्या १२ दुचाकी जप्त केल्या. या सर्वांविरूद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.