शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:43 IST

लवारी व भावड येथे अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करुन झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारुसाठा मिळून आला.

ठळक मुद्देलवारी व भावड येथील प्रकार : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : लवारी व भावड येथे अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करुन झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात दारुसाठा मिळून आला. यात ७५० मिलीच्या पाच पेट्या, १८० मिलीच्या १२ तर, ९० मिलीच्या ९८ पेट्या मिळून आल्या. दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालाची किंमत १४ लाख ९९ हजार ५६० रुपये असल्याचे सांगण्यात येते. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली.साकोली तालुक्यात अवैध दारुचा महापुर वाहत असल्याच्या तक्रारी पथकाला कळताच लवारी येथे पाळत ठेवण्यात आली. कार क्रमांक एम एच ३० ए ए ३४८४ असलेले वाहन पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्या कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या वाहनाचा पाठलाग करुन त्याला अडविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता १७ पेट्यांमध्ये देशी दारु, ६० सिलबंद बाटल्या व वाहन असा एकुण ४ लाख ९४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नरेंद्र सिताराम कोचे (३४) रा. साकोली, मेघराज हेंदाजी भोयर (३८) रा. सेंदुरवाफा यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.दुसरी कारवाई पवनी तालुक्यातील भावड येथे करण्यात आली. एम एच ३१ टी ए ८३१ या क्रमांकाच्या वाहनामध्ये अवैध दारुची वाहतुक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला कळली. त्यांनी ते वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने वाहन थांबविले नाही. पथकाने पाठलाग करुन त्या वाहनाची झाडाझडती घेतली त्यात ९८ पेट्यांमध्ये देशी दारु ५० हजार व ९० मिलीच्या ९८०० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. जप्त वाहनासह दारुसाठा १० लाख ४ हजार रुपयांचे असल्याचे पथकांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील अनिल अशोक कोवे (२३) रा. तळोधी बाळापुर याला अटक करण्यात आली आहे. पवनी तालुक्याला दारुबंदी असलेला चंद्रपूर जिल्ह्याची सिमा लागून असल्याने हा देशीदारुचा साठा चंद्रपूर जिल्ह्यात नेत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.