शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अपघाताचे १४५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 21:58 IST

वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या ३८९ अपघातात १४५ जणांनी आपला प्राण गमाविला. तर २१३ व्यक्ती गंभीर आणि २६० जण किरकोळ जखमी झाले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत.

ठळक मुद्देवर्षभरात ३८९ अपघात : २१३ जण गंभीर तर २६० किरकोळ जखमी

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वर्षभरात झालेल्या ३८९ अपघातात १४५ जणांनी आपला प्राण गमाविला. तर २१३ व्यक्ती गंभीर आणि २६० जण किरकोळ जखमी झाले. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात झाले असून यात सर्वाधिक अपघात दुचाकीचे आहेत.जिल्ह्यात जानेवारी ते १० डिसेंबर पर्यंत ३८९ अपघात झाले आहेत. या अपघातात १४५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक अपघात जानेवारी महिन्यात ४२ झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झालेत. फेब्रुवारी महिन्यात २८ अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. मार्च महिन्यात झालेल्या ३९ अपघातात १५ जण ठार झाले. तर ४४ जण जखमी झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या ३३ अपघातात १५ जण ठार झाले. तर ५३ जण जखमी झाले. मे महिन्यात ४१ अपघात होऊन १७ जणांना आपला प्राण गमवावा लागला. या अपघातात ६१ जण जखमी झाले. जून महिन्यात ३७ अपघातात १६ जण ठार झाले. जुलै १०, आॅगस्टमध्ये नऊ, सप्टेंबर महिन्यात १६, आॅक्टोबर महिन्यात १२, नोव्हेंबर महिन्यात १६ आणि डिसेंबर महिन्याच्या १० तारखेपर्यंत १० अपघातात तीन जण ठार झाले. तर ११ जण गंभीर जखमी झाले.देशभरात अपघातातील वाढती संख्या पाहता शासनाने त्यावर उपाययोजना केल्या नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय सूचविण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली. त्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भंडारा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी १ डिसेंबर पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.अपघाताचे मुख्य कारण म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींची वाहतूक करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, वेग मर्यादा न पाळता वेगाने वाहन चालविणे यामुळे अपघात होत आहेत. अनेकदा रस्ते नादुरुस्त असल्यामुळेही अपघात घडल्याच्या घटना आहेत. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर नादुरुस्त वाहन उभे असल्यास त्यावर दुसरे वाहन आदळून अपघात होतात. जिल्ह्यातील अपघाताची ही संख्या चिंतनीय असून वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळून वाहन चालविण्याची गरज आहे. अनियंत्रीत आणि बेशीस्त वाहतुकीचे बळी अनेक जण ठरतात. मरणाºया व्यक्तीच्या मागे त्याचे कुटुंबिय उघड्यावर पडते. त्यामुळे वाहन चालविताना नियंत्रीत आणि नियमानुसार वाहन चालविणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढत आहेत.अपघातात मदत करणाऱ्यांना त्रास होऊ नयेएखादा अपघात घडल्यास जखमीला रुग्णालयात पोहचविण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. त्यामागचे कारण म्हणजे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा आणि कोर्टाच्या फेऱ्या ठरतात. मोटारवाहन अपघातातील प्रत्यक्षदर्शी आणि मदत करणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी आदेश काढले असून संबंधित सर्व ठाणेदारांना त्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही याबाबत आवश्यक कारवाई करण्याची सूचना दिली आहे.सर्वोच्च न्यायालय आणि रस्ता समितीच्या निर्देशानुसार विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. भंडारा शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली. जनजागृतीसोबतच दंडात्मक कारवाई केली जात आहे. उपाययोजनांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.-बाळकृष्ण गाडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.