शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

१३२ मचाणीवरून १४० प्राणिगणकांनी केली गणना

By admin | Updated: May 14, 2017 00:21 IST

नागझीरा अभयारण्यात बुद्ध पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यातील वन्य प्राण्यांच्या गणनेत नागझीरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात ....

पाच वाघांचे दर्शन : १० बिबट, हरीण, चितळ, अस्वल दिसले, पाणवठ्यावर प्राण्यांची हजेरीशिवशंकर बावनकुळे । लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : नागझीरा अभयारण्यात बुद्ध पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यातील वन्य प्राण्यांच्या गणनेत नागझीरा-नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात पाच वाघाचे तर १० बिबट्यांचे निसर्गप्रेमी प्राणिगणकांना दर्शन झाले त्याचप्रमाणे अन्यप्राणी पक्ष्यांचे दर्शन झाले.प्रगणनेत बिबट्यांसह हरिण, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्रा, निलघोडे, रानगवे आदी वन्यप्राण्यासह मोर, लांडोर इतर पक्ष्याचेही दर्शन झाले. प्रगणकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागला. २४ तास गणनेत १३२ माचाणीवर १४० प्राणीगणकांनी ही गणना केली.नागझीरा नवीन नागझिरा कोका, नवेगावपार्क, नवेगाव वाईल्ड लाईफ अशा वेगवेगळ्या १३२ माचाणीवर १४० प्राणीगणक उपस्थितीत झाले होते. अभयारण्यात पाणवठ्यावरील प्रगणना यशस्वीपणे पार पडली. प्राणीगणनेत सहभागी झालेल्या अनेक प्रगणकांना वाघ, बिबट, हरिण, चितळ, सांबर, अस्वल, निलगाय, रानकुत्र्यांचे दर्शन झाले. पाणवठ्याशेजारच्या मचाणीवर प्रगणकांना बरेचदा व्याघ्रदर्शन झाल्याची माहिती प्रगणकांनी दिली. अभयारण्यात हिस्त्र प्राण्याबरोबर तृणभक्षक प्राण्याचे सर्वाधिक आवडीचे ठिकाण असल्याचे पुन्हा एकदा प्राणीगणनेत सिद्ध झाले. पोर्णिमेची रात्र प्रगणकांना सुखद अनुभूती देणारी ठरली. शहरातील धावपळीपासून दूर, शांत ठिकाणी एकाग्रतेने ध्यानमग्न होवून प्रगणकांबरोबर वनकर्मचारी वर्गाने वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या. विविध प्रकारच्या आवाजांनी रात्रीच्या वेळी चौकस राहण्याची भूमिका पार पाडली.