शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयात 140 जेष्ठांना मिळाली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर जिल्हाभरातील ज्येष्ठांनाही सोमवारपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये ज्येष्ठांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड नियमांचे पालन करून प्रत्येकाची नोंदणी केली जात आहे. ऑनलाईनचा तिढा कायम असल्यास ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून ज्येष्ठांना लस दिली जात आहे.

ठळक मुद्देखाजगीमध्ये शून्य : प्रत्यक्ष व ऑनलाइन नोंदणीच्या भानगडीत गेला पहिला दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने आता १ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयातून लस दिली जाणार  होती. यात सोमवारी फक्त शासकीय रूग्णालयांमधून १४० जेष्ठांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात नेमून दिलेल्या सातही खाजगी रूग्णालयात एकही जेष्ठाला लस देण्यात आली नाही, हे येथे उल्लेखनीय.जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी देण्यात आल्या. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सुटलेले कर्मचाऱ्यांसह ६० वयोवर्ष ओलांडलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयातून नि:शुल्क तर खासगी रुग्णालयात अडीचशे रुपये मोजून लस दिली जात आहे. जिल्ह्यातील सात खासगी रुग्णालयांना कोरोना लस टोचण्याची परवानगी देण्यात आली होती.  पहिल्या दिवशी या रुग्णालयातून कुणालाही लस देण्यात आली नाही.  २५० रूपये मोजून ही लस घ्यावी लागणार आहे. ६० वर्षे वयोगटातील १३१ व्यक्तींना आणि ४५ ते ६० वयोगटातील नऊ व्यक्तींना कोरोना लस देण्यात  आली.  

जिल्हा सामान्य रुग्णालय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आरोग्य विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर जिल्हाभरातील ज्येष्ठांनाही सोमवारपासून कोरोना लस देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये ज्येष्ठांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोविड नियमांचे पालन करून प्रत्येकाची नोंदणी केली जात आहे. ऑनलाईनचा तिढा कायम असल्यास ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून ज्येष्ठांना लस दिली जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम यशस्वी झाल्यास जिल्हा भरातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही ज्येष्ठांसाठी लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आठ ठिकाणी लसीकरण मोहीम

 भंडारातील जिल्हा सामान्य रूग्णालयासह दोन तालुक्यातील सर्वच मुख्य तालुका रूग्णालयात १४० जेष्ठांना लस देण्यात आली. यात मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर येथील प्रत्येकी एका सेंटरचा समावेश आहे.  खासगी रुग्णालय अंतर्गत साकोली येथील पार्वती नर्सिंग होम, पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इंद्राक्षी आय केअर, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम, भुरे हॉस्पिटल तुमसर व तुमसर सिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात ही लस उपलब्ध करून देण्यात येणार होती. खाजगीमध्ये एकही जेष्ठांना लस देण्यात आली नाही.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस