शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४ दिवसांपासून दिव्यांग कुटुंबीयांचे उपोषण सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:59 IST

शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता डोंगरी (बुज.) येथे मॉईल प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग शेतकऱ्यांचे कुटुंब मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मॉईलने शेती संपादीत केली. परंतु नोकरी दिली नाही, असा आरोप येथे शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. दिव्यांग कुटुंबीयांकडे शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नोकरीपासून वंचित, दशकभरपासून लढा सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता डोंगरी (बुज.) येथे मॉईल प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग शेतकऱ्यांचे कुटुंब मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मॉईलने शेती संपादीत केली. परंतु नोकरी दिली नाही, असा आरोप येथे शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. दिव्यांग कुटुंबीयांकडे शासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.तुमसर तालुक्यात डोंगरी येथे मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेडची खाण आहे. या खाणीत बाळापूर येथील विजय बर्वे यांची शेती मॉईल प्रशासनाने २० वर्षापूर्वी संपादीत केली होती. परंतु २० वर्षे लोटूनही नोकरी दिली नाही. त्याविरोधात दि.२८ जुलै पासून बर्वे कुटुंबिय डोंगरी खाणीसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आशिया खंडात क्रमांक एकची खाण म्हणून डोंगरी मॅग्नीज खाणीचा समावेश होतो. या परिसरातील हजारो एकर शेती मॉईलने संपादित केली व त्या मोबदल्यात नोकरी दिली. परंतु बाळापूर येथील विजय बर्वे यांच्या वडीलाच्या मालकीची शेती मॉईलने संपादीत केली. त्याचा आर्थिक मोबदला दिला. परंतु नियमानुसार कुुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली नाही. सध्या मॉईल प्रशासन नोकरी देण्यास टाळाटाळ करीत आहे. बर्वे कुटुंबियांची शेती गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्याविरोधात बर्वे कुटुंब चिमुकल्या मुलाबाळांसह भर पावसाळ्यात आमरण उपोषणावर दि.२८ जुलैपासून बसलेले आहेत. शिवसेनेने येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बर्वे हे दिव्यांग असून भंडारा जिल्हा ग्रामपंचायत युनियनचे कार्याध्यक्ष रामलाल बिसने यांनी उपोषण मंडपाला भेट देवून आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. उपोषण मंडपाला तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी भेट देऊन मॉईलचे एजेंट राजेश भट्टाचार्य यांचेशी चर्चा केली. सदर विषय सोडविण्यात अडचणी असल्याचे त्यांनी तहसीलदार बालपांडे यांना सांगितले. यावेळी उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याच्या सूचना तहसीलदार बालपांडे यांनी दिल्या. येथे मॉईल प्रशासनाचे एजंट राजेश भट्टाचार्य यांनी बिसराज बर्वे यांची जमीन संपादित केली असून त्या गटावर नोकरी दिल्याची माहिती सांगत आहेत. तसे दस्ताऐवज त्यांनी तहसीलदार तथा इतर अधिकाºयांना दाखविले. या सर्व प्रमाणपत्राची येथे चौकशी करण्याची गरज आहे.बर्वे कुटुंबियांची शेती संपादीत करण्यात आली. त्या गटावर नोकरी देण्यात आली आहे. सदर विषय सोडविण्यास अडचणी येत आहेत.-राजेश भट्टाचार्य,मॉईल एजंट, खाण प्रशासन डोंगरी