शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विवाह सोहळ्यात १४ युगुलांचा ‘निकाह’

By admin | Updated: May 26, 2015 00:40 IST

वाढती महागाई यावर आळा बसावा व वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून मुस्लीम निकाह कमिटीने सामूहिक विवाह ....

सामूहिक विवाह सोहळा : मुस्लीम निकाह कमिटीचा उपक्रमभंडारा : वाढती महागाई यावर आळा बसावा व वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून मुस्लीम निकाह कमिटीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होत. या सोहळ्यात मुस्लिम समाजातील १४ युगलांना विवाह बंधनात बांधण्यात आले. हा स्तुत्य सोहळा शहरातील मुस्लिम लायब्ररी येथे पार पडला.भंडारा शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुस्लीम निकाह कमेटीच्या वतीने मागील ८ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा हा नववा सामूहिक विवाह सोहळा होता. या सोहळ्यासाठी मुस्लिम निकाह कमेटी तथा मुस्लिम लायब्ररीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.यावर्षी मुस्लीम समाजातील १४ वधू-वरांचा निकाह करण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. मागीलवर्षी १२ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले होते. परिणय बंधनात अडकलेल्या युगलांना कमेटीच्या वतीने वैवाहिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची भेट देण्यात आली. त्यात पलंग, गादी, आलमारी, कपडे व भांड्यांचा समावेश आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची जेवणाचा खर्चही कमेटीने उचलला. या सोहळ्यासाठी वधू-वरांकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मागणी करण्यात आली नव्हती. विवाह सोहळ्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद कमेटीच्या ४५ सदस्यांनी प्रत्येकी एक हजार रूपये जमा करून केली व सोबतच शहरातील मान्यवरांकडूनही काही आर्थिक मदत घेण्यात आली. यशस्वीतेसाठी कमेटीचे अध्यक्ष सैय्यद सोहेल, फरहान खान, अरफात खान, अफसर खान, शकेबउद्दीन, खापीज खान, जुनेद खान, रिजवान काजी, अनिक जमा, तनविर खान, रिजवान खान, शेख शाबाद पाशा, अवेश खान, जुनेद खान, अमजद खान आदींनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)