शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१४९ गावांमध्ये ‘पाणीटंचाई’चे सावट!

By admin | Updated: January 14, 2015 23:01 IST

जिल्ह्यातून वाहणाऱ्या जीवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला तरी जीर्ण जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली आहे. या जलवाहिनीमुळे कुठे दूषित तर कुठे

टँकरमुक्त जिल्हा : १.८२ कोटींचा आराखडा, गावांचे होणार सर्वेक्षणइंद्रपाल कटकवार - भंडाराजिल्ह्यातून वाहणाऱ्या जीवनदायिनी वैनगंगेचा जलस्तर पाहता आणि भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा असला तरी जीर्ण जलवाहिनी ठिकठिकाणी फुटलेली आहे. या जलवाहिनीमुळे कुठे दूषित तर कुठे अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यात १४९ गावांसाठी २९३ उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांसाठी एक कोटी ८२ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.जिल्ह्यातील भूगर्भात पाण्याचा मुबलक साठा आहे. म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या यादीत गत २० वर्षांपासून टँकरमुक्त म्हणून घोषित आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या मोठी आहे. तलावांची लक्षणीय संख्या व त्यातल्या त्यात वैनगंगा व तिच्या उपनद्यांमुळे पाण्याची पातळी असतेच. मात्र पाणी वाटपाची यंत्रणा तितकी प्रभावी नाही. अनेक गावामंध्ये पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरही पाण्याची समस्या भेडसावत आहे. मे महिन्यात अनेक गावांमध्ये पाणी पेटणार आहे. जिल्ह्यात ७९६ गावे आहेत. जिल्हा प्रशासनाने संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ एप्रिल ते जूनचा कृती आराखडा तयार केला. यात ६१ विहीरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे प्रस्तावित आहेत. २२ नळयोजनांची दुरूस्ती तर १८ गावांमधील १२३ विंंधन विहीरींची दुरूस्ती, १९ ठिकाणी कुपनलिका घेण्याचा प्रस्ताव असला तरी ही कामे अद्याप झालेली नाहीत. या गावांमध्ये पाणी टंचाई असली तरीसुद्धा टँकर किंवा बैलबंडीने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था नाही. यासाठी जिल्ह्यातील एकूण १४९ गावांसाठी १ कोटी ८२ लक्ष रुपयांची उपाययोजना प्रस्तावित आहे. परंतु त्यापूर्वी गावात सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.