शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विविध आजारांतर्गत १३ हजार शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:14 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू नागरिकांच्या विविध आजारावर उपचार करण्यात येतात. या वर्षात सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण व अंतररुग्ण मिळून २ लाख ४७ हजार २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२ लाख ४७ हजार रुग्णांची तपासणी : ११५८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू नागरिकांच्या विविध आजारावर उपचार करण्यात येतात. या वर्षात सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण व अंतररुग्ण मिळून २ लाख ४७ हजार २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ७ हजार ७८७ मोठया शस्त्रक्रिया व ५ हजार ३७९ किरकोळ शस्त्रक्रिया अशा एकूण १३ हजार १६६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा वेळेत मिळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध राबविण्यात येतात. त्याअंतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.गरोदर महिलांची प्रसुती रुग्णालयात करण्यासाठी योजना असून या योजनेंतर्गत ६ हजार ९६१ गरोदर महिलांची प्रसुती रुग्णालयात करण्यात आली आहे.भंडारा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी विविध आधुनिक यंत्रसामुग्री असून १२ हजार ९६३ रुग्णांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली आहे. १ हजार ८०० रुग्णांची सिटिस्कॅन तपासणी करण्यात आली आहे. तर ९ हजार ७१५ रुग्णांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली आहे.जननी सुरक्षा योजना ही आरोग्य विभागाची महत्वाची योजना असून या योजनेत जिल्ह्याला ५ हजार २०६ एवढे उद्दिष्टय प्राप्त झाले होते.फेब्रुवारी २०१८ अखेर या योजनेत ६ हजार ९६१ प्रसुती करण्यात आल्या आहेत. उद्दिष्टापेक्षा अधिक काम जननी सुरक्षा योजनेत करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी करण्यात येते. यावर्षी शहरी व ग्रामीण मिळून २ लाख ८६ हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील २३ हजार ४६० विद्यार्थ्यांना उपचार दिले आहे. १२५ विद्यार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून २६ विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ११५८ कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी १३१ टक्के एवढी आहे. मोतीबिंदु शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट १६०० एवढे असतांना जिल्ह्यात ३४४२ मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.ही टक्केवारी २१५ टक्के एवढी आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र वाटपाचा विशेष कार्यक्रम सामान्य रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ या दोन महिन्यात ३५३ दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.