शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाख खर्चूनही झाडांना घोटभर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:43 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा शिवारात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी घोटभर पाणी दिले जात आहे.

ठळक मुद्देअनेक झाडे भुईसपाट : रनेरा शिवारात शासकीय निधीचा सावळागोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा शिवारात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी घोटभर पाणी दिले जात आहे. त्यामुळे अनेक झाडे भुईसपाट झाले आहेत. १३ लाख खर्चाचे नियोजन करताना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कोसो दूर आहे.तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा ते मोहगाव (खदान) गावापर्यंत सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या वृक्ष लागवड व वृक्षांचे संगोपन करण्यासाठी रोहयो अंतर्गत १३ लाख ५६,५३३ रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. २ कि.मी. अंतर पर्यंत वृक्ष लागवडीचे नियोजन असताना हरदोलीत मोहगाव (खदान) गावापर्यंत वृक्ष लागवड करताना डच्चू देण्यात आला आहे. दीड कि.मी. अंतराचे मार्गाला वृक्ष लागवडीमधून बगल देण्यात आला आहे. रनेरा ते रनेरा गावाचे हद्दीत अर्धा कि.मी. अंतरापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली.दरम्यान अर्धा कि.मी. अंतरापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी संगोपनअभावी वृक्ष लागवडीचा सांगाडा शिल्लक आहे. अनेक झाडे जिवंत नाही. काही झाडे जिवंत असली तरी भूईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. काही झाडे अंतिम घटका मोजत असून या झाडांना बॉटलने पाणी दिले जात आहे. याशिवाय झाडांची सुरक्षा करण्यासाठी फाद्यांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.यासाठी निधी खर्च करण्यात येत आहे. जे झाडे पाण्याअभावी कोमेजले आहेत अशा जागेत आणि खड्ड्यात नवीन झाडांची लागवड केली जाते. परंतु ही झाडे निर्जीव ठरत आहेत. यामुळे लाखो रूपयाचा निधी असताना उपक्रम कोसो दूर गेल्याचे दिसून येत आहे.