शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात १२६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2022 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट संपली. २७ मार्च रोजी जिल्ह्यात शेवटचा रुग्ण आढळला होता. शासनाने कोरोना नियमातून सवलत दिली. त्यानंतर कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्कचा वापर तर सर्वच जण विसरले आहेत. अशा स्थितीत २० मे रोजी एक रुग्ण आढळून आला. सुरुवातीच्या काळात एक-दोन रुग्ण आढळून येत होते. मात्र जून महिन्यात रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागली. जुलै महिन्यात तर दररोज रुग्ण आढळत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तिसऱ्या लाटेनंतर कोरोनामुक्त झालेल्या भंडारा जिल्ह्यात आता वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल १२६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. दररोज सरासरी १५ रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची ही वाढती संख्या चौथ्या लाटेचे तर संकेत नाही ना, अशी शंका येत आहे. जिल्ह्यात सध्या ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून सर्वाधिक तुमसर तालुक्यात आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट संपली. २७ मार्च रोजी जिल्ह्यात शेवटचा रुग्ण आढळला होता. शासनाने कोरोना नियमातून सवलत दिली. त्यानंतर कुणीही नियमांचे पालन करताना दिसत नाही. मास्कचा वापर तर सर्वच जण विसरले आहेत. अशा स्थितीत २० मे रोजी एक रुग्ण आढळून आला. सुरुवातीच्या काळात एक-दोन रुग्ण आढळून येत होते. मात्र जून महिन्यात रुग्णांची संख्या हळूहळू वाढायला लागली. जुलै महिन्यात तर दररोज रुग्ण आढळत आहेत. १ जुलै रोजी १२, २ जुलै रोजी १७, ३ जुलै १५, ४ जुलै रोजी ११, ५ जुलै रोजी नऊ, ६ जुलै रोजी १६, ७ जुलै रोजी १५, ८ जुलै रोजी २० आणि शनिवार ९ जुलै रोजी ११ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. नऊ दिवसांत १२६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. यामुळे आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.

दोन व्यक्तींवर रुग्णालयात उपचार

- जिल्ह्यात ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी एक व्यक्ती शासकीय रुग्णालयात तर दुसरी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ८० व्यक्ती गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. - जिल्ह्यात सध्या ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक ३६ तुमसर तालुक्यातील आहेत. भंडारा २५, पवनी नऊ, लाखनी सहा, मोहाडी तीन, लाखांदूर दोन आणि साकोली तालुक्यात एक रुग्ण आहे. शनिवारी १५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

शनिवारी ११ नवे रुग्ण- जिल्ह्यात शुक्रवारी ६७० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तुमसर तीन, मोहाडी, पवनी, लाखनी येथे प्रत्येकी दोन तर भंडारा आणि साकोली प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नियमांचे पालन मात्र कुठेही होत नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या