शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१२,५८५ शिधापत्रिका आधार लिंकिंगविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:51 IST

सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील १ लक्ष ८० हजार ५८३ शिधापत्रिकांची लिंकींग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

ठळक मुद्देअन्न सुरक्षा योजनेने वाढविली कामे : उज्ज्वला योजनेचे ८ हजार ग्राहक प्रतीक्षेत

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सार्वजनिक वितरण प्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील १ लक्ष ८० हजार ५८३ शिधापत्रिकांची लिंकींग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यात १२ हजार ५८५ शिधापत्रिका अजूनही आधार कार्डाशी संलग्न झालेले नाही.जिल्हा पुरवठा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना धान्याचे व रॉकेलचे वितरण करण्यात येत असते. राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचे कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याचे काम हाती घेतले. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थीसह अन्य योजनेअंतर्गत एकुण शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लक्ष ८० हजार ५८३ इतकी आहे. यापैकी १ लक्ष ६७ हजार ९९८ शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक झाले आहे. उर्वरीत १२ हजार ५८५ शिधापत्रिका अजूनही आधारकार्डाशी लिंकींग झालेले नाही. विशेष म्हणजे प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत अंत्योदयचे ६३ हजार २८१, बीपीएलचे ७३ हजार ४०१ व केशरी कार्ड धारक अंतर्गत ४३ हजार ९०१ लाभार्थी आहेत.जिल्ह्यात बीपीएलधारकांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ५५ हजार ९०५ लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ४३ हजार २३६ अर्ज मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत ३४ हजार ८७५ लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस जोडणीचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे ८ हजार ३६१ लाभार्थी अजूनही उज्ज्वला गॅस जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत.जिल्ह्यात ८९० पॉस मशीनस्वस्त धान्य वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने पॉस (पॉइंट आॅफ सेल) ही मशीन जिल्ह्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात लावली आहे. यात शिधापत्रिका धारकांच्या उपस्थितीविना धान्य मिळणे दूरापास्त आहे. परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे पॉस या मशीनीमुळे वितरण व्यवस्था पारदर्शक झाली काय? असा सवालही व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यात असलेल्या शिधापत्रिका धारकांचे कार्ड आधार कार्डाशी लिंकींग करण्याचे काम सुरु आहे. सदर काम पूर्ण करण्याचा मानस आहे.-रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.