शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

११ लाखांची मजुरी अडली

By admin | Updated: December 25, 2014 23:27 IST

जिल्ह्यातील तालुका कृषी बीज गुणन केंद्र आणि नर्सरी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोन वर्षांपासून सुमारे ११ लाख ११ हजार रूपयांची मजुरी अडली आहे. दरवेळी पुरक मागणी केल्यानंतरही मजुरांच्या

इंद्रपाल कटकवार - भंडाराजिल्ह्यातील तालुका कृषी बीज गुणन केंद्र आणि नर्सरी केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची दोन वर्षांपासून सुमारे ११ लाख ११ हजार रूपयांची मजुरी अडली आहे. दरवेळी पुरक मागणी केल्यानंतरही मजुरांच्या मजुरीचा अनुशेष कायम असल्याने केंद्र चालवायचे कसे? असा सवाल कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी केला आहे.राज्याच्या कृषी विभागातर्फे एकूण १८५ तालुका बीजगुणन केंद्रांची व ९ अन्विक्षा प्रात्यक्षिक केंद्र चालविली जातात. याअंतर्गत भंडारा जिल्ह्यात ४ बीजगुणन केंद्र व दोन नर्सरी केंद्र आहेत. सदर बीज गुणन केंद्र पहेला ता.भंडारा, पालोरा ता.पवनी, डोंगरगाव ता.मोहाडी आणि साकोलाी येथे आहे. साकोली येथील कारभार कृषी उपविाभाागाीय कार्यालयातून बघितला जातो. या केंद्रांमध्ये कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या सुधारीत बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी बियाणंच्या निर्मितीचे काम येथे करण्यात येते. या केंद्रांमध्ये बियाणांची पेरणी करणे, खते निर्माण (मिक्स पध्दती) करणे, मळणी करणे, बियाणांवर प्रक्रिया, कीटकनाशकांची फवारणी करणे, बियाणांची पॅकींग ही कामे येथे केली जातात. या कामांसाठी ठेकेदारी पद्धतीने मजुर कामावर घेतले जातात. परंतु निधीअभावी या मजुरांना त्यांची मजुरी वेळेवर मिळत नाही.या केंद्रांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यासाठी अंदाज पत्राकात होणाारी निधीचाी तरतूद अल्प प्रमाणात्त असते. परिणामी मजुरांना मजुरी वेळेवर मिळत नाही. सन २०११-१२ ची मजुरी य्यााावर्षी देण्यात आली. मात्र सनाा २०१२-१३, सन २०१३-१४ आणि सन २०१४-१५ ची मजुरी अजुनही मजुरांना मिळालेली नाही. यात पहेला, डोंगरगाव, पालोरा आणि आंधळगाव व भंडारा येथे कार्य केलेल्या मजुरांचा समावेश आहे. बीज गुणन केंद्रातील मजुरांची ४ लक्ष ३ हजार ६२८ रूपये तर नर्सरीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे जवळपास ७ लक्ष ११ हजार ७८ रूपये द्यायचे आहेत.