शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

१०० टक्के व्यसनमुक्त गाव ‘बोंडे’

By admin | Updated: March 1, 2016 00:23 IST

व्यसनमुक्त व आदर्श गावांचा पुरस्कार मिळालेल्या गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहेत.

गावात गुटखा व दारूचे दुकाने नाहीत : दर आठवड्याला मानवधर्माची नियमित बैठकयुवराज गोमासे करडी व्यसनमुक्त व आदर्श गावांचा पुरस्कार मिळालेल्या गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेक गावात आंदोलने होत आहेत. महिलांनी आवाज बुलंद केला आहे. मोहाडी तालुक्यातील आदिवासी ‘बोंडे’ गाव त्याला अपवाद ठरत असून सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले आहे. बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणेने, स्वयंस्फुर्तीने १०० टक्के गाव व्यसनमुक्त झाले आहे. मोहाडी तालुक्यातील खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेले बोंडे हे छोटेशे आदिवासी गाव. गावाचा मुख्य व्यवसाय शेती व मजुरी आहे. लोकसंख्या २१८ कुटूंब संख्या ४८ आहे. गोंड, गोवारी, कलार, कुणबी आदी समाजाचे वास्तव्य आहे. कोका जंगल टेकड्याच्या पायथ्याशी गाव असताना संपूर्ण गावातील रस्ते व नाल्या सिमेंट काँक्रिटने बांधलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रंगमंच व हनुमंताचे मंदिर गावात आहेत. संपूर्ण गाव महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मानवधर्मात सहभागी आहे.दहा वर्षापुर्वी गावाची स्थिती वाईट होती. गावात पक्के रस्ते व नाल्याही नव्हत्या. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारात भटकावे लागेल. गावातील सर्वांना दारूचे जडले होते. कुटूंब व घरादारांची अवस्था दयनिय झाली होती. भांडणे तर पाचवीलाच पुजलेले असायचे. भूतबाधा, अंधश्रद्धा, जादूटोना, अंगात देवी-देवता येणे आदीमुळे गावाची सुख-शांती भंग पावली होती. दिवस रात्र कमावते व्यक्ती व्यसनात बुडालेले राहत असल्याने महिलांची कुचंबना व्हायची. लहान मुलांना शाळेतही पाठविले जात नव्हते. बाबा जुमदेवजी यांच्या मानवधर्मामुळे हे चित्र दहा वर्षानंतर पालटले. गावातील दुधराम मेश्राम हे या धर्माचे पहिले सेवक झाले. त्यांचे कार्य सुरूवातीला कुणालाही पटत नव्हते. मात्र एकएक कुटूंब मानवधर्माचा सेवक झाला. आध्यात्म प्रमुख प्रचारक लता बुरडे, यशवंत ढबाले यांच्या मार्गदर्शनामुळे दहा वर्षात संपूर्ण गाव १०० टक्के मानवधर्ममय होऊन व्यसनमुक्त झाले. गावात एकही दारूचे, गुटखा व खर्राची दुकाने बंद करण्यात आली. स्वयंस्फुर्तीने गावात दर आठवड्याला प्रत्येकाच्या घरी चर्चा बैठक होऊन एकमेकाचे दु:ख समजून सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने एकतेची ज्योत अखंड तेवत आहे. या गावाला सन २००९-१० मध्ये स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाला. कोका वन्यजीव अभयारण्यामार्फत ग्राम परिस्थिती की विकास समितीचे अध्यक्ष रविकुमार मरस्कोल्हे यांच्या पुढाकारात गावातील प्रत्येक कुटूंबाला स्वयंपाकाचे गॅस व दुधाळ जनावरांचे वाटप नुकतेच करण्यात आले. प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे काम पुढील महिन्यापासून सुरू केले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.