शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी आरोपीला १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:38 IST

विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने

प्रकरण भंडारा येथील : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका ३२ वर्षीय आरोपीला १० वर्षांचा सश्रम कारावास व ३६ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अकिल अहमद वकील अहमद शेख, असे आरोपीचे नाव आहे. हा निकाल गुरूवारला दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी दिला.राजीव गांधी चौक परिसरातील रहिवासी असलेल्या अकील अहमद शेख याने १८ जून २०१३ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सदर महिला घरी असताना अकिलने महिलेला दुचाकीवर बसवून अन्य ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सदर आरोपी महिलेच्या घरी वारंवार येऊन महिलेचे अश्लिल छायाचित्र व व्हिडीओ चित्रीकरण करून मोबाईल किंवा इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन महिलेला आपल्या मनाप्रमाणे वागवित होता. याप्रकरणी कुणाशीही चर्चा केल्यास किंवा विरोध केल्यामुळे अकिलने महिलेला कुऱ्हाडीने आणि ब्लेडने चिरे मारून दुखापत केली. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पिडीत महिलेने भंडारा पोलीस ठाण्यात केली होती. तपासाअंती पोलिसांनी अकिलविरूद्ध भादंवि ३७६ (२), ३६३, ३६६, ३२४ व ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. इंटरनेटच्या माध्यमातून महिलेची बदनामी केल्याचा कलमांतर्गतही अकिलवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. प्रकरण न्याय प्रविष्ठ झाल्यावर २५ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले कुऱ्हाड व अन्य पुरावे न्यायालयातसमोर हजर करण्यात आले. संपूर्ण प्रकरणाच्या सहानिशेनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी गुरूवारी अकिलला दोषी ठरवित विविध कलमांतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व ३६ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास अधिकारी पुडके यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते तर सहायक फौजदार किशोर ईलमकर यांनी प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणी न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.दुर्गा सुरेश तलमले यांनी बाजू मांडली.