शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे १० ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: June 5, 2017 00:16 IST

तामसवाडी (सि.) येथील वैनगंगा नदी पात्रातून रेतीचे अवैध खनन मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरु आहे.

तामसवाडी घाटावर रेतीचे अवैध खनन : महसूल प्रशासाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह, नायब तहसीलदारांनी दोन ट्रॅक्टर सोडल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तामसवाडी (सि.) येथील वैनगंगा नदी पात्रातून रेतीचे अवैध खनन मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरु आहे. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास डोंगरला सीतेपार रस्त्यावर रेतीचे १० ट्रॅक्टर नायब तहसीलदारांनी पकडले. या कारवाईने रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी (सि.) रेती घाट रेती करिता प्रसिद्ध आहे. सध्या हा रेती घाट महसूल प्रशासनाने बंद केला आहे. परंतु दररोज या रेती घाटावर रेतीचे अवैध उत्खनन मागील अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरुच आहे. यापूर्वीही महसूल प्रशासनाने येथे अनेक वेळा कारवाई केली. परंतु चोरटी रेती उत्खनन व वाहतूक सुरुच आहे.रविवारी दुपारी ३ च्या सुमारास नायब तहसीलदार एन.पी. गौंड यांनी डोंगरला सीतेपार रस्त्यावर पाळत घेवून दहा अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. कारवाईकरिता तुमसर तहसील कार्यालयात ते जमा करण्यात आले. दरम्यान ट्रॅक्टर चालक व मालकांनी कारवाई दरम्यान दोन रेती ट्रॅक्टर नायब तहसीलदार एन.पी. गौंड यांनी सोडल्याचा आरोप केला आहे. त्या ट्रॅक्टरवरही कारवाईची मागणी ट्रॅक्टर चालक मालकांनी केली आहे.शनिवारी तथा रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी अवैध रेती उत्खनन तथा वाहतुकीला मोठा उत आला आहे. अधिकारी - कर्मचारी सुटीचा येथे अवैध रेती वाहून नेणारे फायदा उचलतात. दोनदिवसापूर्वी तहसील कार्यालयात जिल्हा खनिकर्म अधिकारी येऊन गेले होते. सध्या तुमसर तालुक्यातील जे रेती घाट बंद आहेत त्या रेती घाटावरून सर्रास रेतीचे अवैध उत्खनन सुरु आहे. येथे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.शासनाच्या कोट्यवधींचा महसूल येथे बुडत असून तुमसर तालुक्यात रेती माफीयांचे रॅकेट सक्रीय आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाशिवाय रेती उत्खनन व चोरटी वाहतूक शक्यच नाही हे विशेष.