शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रगणनेत आढळला १ वाघ,११ बिबट

By admin | Updated: May 13, 2017 00:17 IST

भंडारा वनविभागात येणाऱ्या एकूण १० वनक्षेत्रातील वनांत एकूण ८७ पाणवठयांवर करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणेत....

८७ पाणवठयांवर वन्यप्राणी प्रगणना : ३,७५८ प्राण्यांचे वास्तव्य, २३ प्रकारचे प्राणी भंडारा : भंडारा वनविभागात येणाऱ्या एकूण १० वनक्षेत्रातील वनांत एकूण ८७ पाणवठयांवर करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणेत एक वाघ व ११ बिबट आढळले असून २३ प्रकारच्या एकूण ३,७५८ वन्यप्राण्यांची नोंद या प्रगणनेत करण्यात आली.बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही प्राणी प्रगणना करण्यात आली. यात वाघ-१, बिबट-११ चितळ ६८०, हरिण ६८, तडस-२, चौसिंगा-३, सांभर-१५३, निलगाय-२२९, रानडुक्कर-१०२४, अस्वल- ३४, रानकुत्रे-९६, रानगवे-५, भेडकी -३९, मोर -१६७, काळवीट - ५, ससे -२२, खोकड-२, लांडगा -३०, कोल्हा -१९, रानमांजर -६, माकड -११६१ आणि इतर १ अशी एकूण ३,७५८ प्राण्यांची नोंद करण्यात आली.भंडारा वन विभागातील भंडारा, अडयाळ, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, जामकांद्री, लेंडेझरी व नाकाडोंगरी अशा एकूण ८७ पानवठयांवरील मचानावर एक वन विभागाचा कर्मचारी व एक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी असे दोन व्यक्तींनी १० मे रोजी दुपारी १२ वाजतापासून दुसऱ्या दिवशी ११ मे दुपारी १२ वाजतापर्यंत पाणवठयावर येणाऱ्या वन्यप्राण्यांची प्रगणना केली. उन्हाळयात वन्यप्राणी २४ तासातून एकदा पाणी पिण्याकरीता येतात. पाणवठयावर बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद विहित प्रपत्रात करण्यात येते. यात तृणभक्षी व मांसभक्षी अशा दोन्ही प्रकारच्या वन्यप्राण्यांची प्रजातीवर प्रगणना करण्यात आली. तुमसर, नाकाडोंगरी, जामकांद्री व लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील काही भागात दोन दोवसापूर्वी पाऊस आल्याने व बावणथडी प्रकल्पातून नहरात पाणी सोडल्यामुळे वन्यप्राण्यांच्या दृश्यतेस कमतरता जाणवली. सदर प्रगणेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना भंडारा वन विभागाद्वारे प्रशस्तीपत्र देण्यात आले. उपरोक्त वन्यप्राणी प्रगणना उप वनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक मनोहर गोखले, यांचे मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक राकमल जोब, शाहिद खान यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली.