शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सदगुरुंना शरण का जावे ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 17:21 IST

मनुष्य सुख मिळाले की अनंदीत होतो व दुःख आले की मनात कष्टी होतो.

सदगुरुंना शरण का जावे ? ते यासाठी की, सदगुरुंनी जे जाणले ते गम्य, तो सहज आकलन न होणारा आनंद गुरुकृपेने खर्‍या शिष्याला लाभतो. एकनाथ महाराज म्हणतात, गुरुंचा अशा दृष्टीने लाभलेला उपदेश  शिष्याला व्दंव्दात बांधु  शकत नाही.                  अदृष्टें देहीं वर्ततां देख । बाधूं न शके सुखासुख ।           हें गुरुगम्य अलोलिक । शिष्य श्रध्दिक पावती ॥

अदृष्ट म्हणजे जे नजरेत येत नाही. प्रारब्ध मनुष्याचे दृष्टीत येत नाही म्हणून त्याला संत अदृष्ट म्हणतात. नाथ माऊली म्हणतात, सदगुरु उपदेश करतात की, प्रारब्धाला स्वीकारले तर सुखासुख म्हणजे सुख व असुख म्हणजे दुःख मनुष्याला बांधु शकत नाहीत. जीवनात सुख व दुःख येणारच.  सुख दुःख आहे त्याचे नांवच संसार आहे. कधी सुख येते कधी दुख येते. ते अपरिहार्य आहे. दिवस व रात्र आळीपाळीने यावी तसे सुख दुःख येत राहतात. पण मनुष्य सुख मिळाले की अनंदीत होतो व दुःख आले की मनात कष्टी होतो.परंतु तुम्ही ते स्वीकारा, हे गुरुगम्य, हा गुरु उपदेश तुम्ही जाणला तर त्याचे अलौकिकत्व कळेल. पण हे तेव्हाच कळते जेव्हां शिष्य श्रध्दावान असेल. श्रध्दा असेल तरच गुरुगम्य जे आहे जाणले जाऊ शकते.  गुरुगम्य ज्याने जाणले त्याला सुख दुःख बाधु शकत नाहीत. गुरु जाणतात की, प्रारब्ध तर ब्रह्मज्ञान्यालाही चुकले नाही.        एकनाथ महाराज म्हणतात,         जरी झाले ब्रह्मज्ञान तरी ब्रह्मज्ञान्यालाही प्रारब्ध सुटत नाही. कारण मनुष्यानेच कर्मांना दिलेल्या गतीचा  प्रारब्ध परिणाम आहे. जसे कुलाल म्हणजे कुंभार चाकाला गती देतो व त्या चाकावर मातीचे भांडे हाताने आकार देवून तयार करतो व तयार झाले की उचलून घेतो. परंतु चाकाला जी गती दिली ती भांडे तयार झाले तरी थांबत नाही.  तसेच मोठे झाड जर मुळासकट उन्मळून पडले तरी क्षणात सुकत नाही. कारण झाडात जी अनेक वर्षाची संचित आर्द्रता आहे ती कायम राहते. तेव्हा गुरु उपदेश हाच असतो की, आलेल्या सुख दुःखाचे गतीला पहा, त्या चक्राला अजून गती देऊ नका. म्हणजे चक्र थांबेल. झाड सुकविण्याची घाई करु नका, तुम्ही पहा ते सुकेल. प्रारब्धाचे तसेच आहे. आपण सायकलला पॅडल मारले की, पॅडलने जी गती दिली तेवढी सायकल चालणार. म्हणून प्रारब्धाची असलेली गती थांबेपर्यंत शांत चित्ताने पाहणे जरुरी आहे. साधु संतांवर वा  विवेकवंतावर भोग आले तर ते स्वतःठायी असलेल्या शांतील धरुन वागतात. हा बोध  गुरुगम्य आहे.            श्रध्देवीण सर्वथा । गुरुगम्य न ये हाता          गुरुगम्येंवीण तत्त्वतां । द्वंद्वसमता कदा न घडे ॥शिष्याचे मनात, भक्ताचे मनात श्रध्दा नसेल तर गुरुने दिलेला बोध हाती येत नाही, अर्थात कळत नाही.  जर बोध झाला नाही तर सुख दुःखामध्ये समतेचा,  सुख दुःखाचे स्थितीत स्थिर राहण्याची स्थिती कधीही घडून येणे नाही. म्हणून सदगुरु चरणी लागून गुरुगम्य जाणावे.          अनंतकोटी ब्रह्मांडनायक  महाराजाधिराज योगीराजपरब्रह्म सच्चिदानंद समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय !

सदगुरु श्री एकनाथ महाराजांना श्रध्दा नमन !

शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक