शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हनुमंताला आपल्या शक्तीचा विसर का पडला होता? त्याच्या शक्तीची जाणीव त्याला कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 14:42 IST

कठीण प्रसंगी कोणी गर्भ गळीत झाले असता, त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणे, या प्रसंगाची तुलना रामायणातल्या या प्रसंगाशी केली जाते. 

सीतेचे अपहरण झाले, तेव्हा राम लक्ष्मणासह सीतेच्या शोधार्थ निघाले होते. वाटेत त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. सीतेचा शोध घेण्याकरता हनुमंतानेच सुग्रीव, जांबुवंत आणि आदी वानरसेनेशी हनुमंतांनी रामाचा परिचय करून दिला होता. सीतेला रावणाने पळवून लंकेत नेले आहे, हे कळल्यावर सीतेचा तपास काढण्यासाठी रामांनी हनुमंताला लंकेत जाण्यास सांगितले. तेव्हा हनुमंताने आपली असमर्थता व्यक्त केली. समुद्र पार करून लंकेत जाण्यास आपण योग्य नाही, असे म्हटले. तेव्हा त्याला जांबुवंतांनी त्याच्या ठायी असलेल्या अपार शक्तीची जाणीव करून दिली. परंतु, प्रश्न असा पडतो, की तोवर हनुमंत स्वतःकडे असलेल्या शक्तीपासून एवढा अनभिज्ञ का होता? हनुमंताने जन्मतःच भूक लागली म्हणून सूर्याचा गोळा फळ समजून खाण्यासाठी आकाशी झेप घेतली होती. सूर्याला गिळंकृत करायला निघालेल्या हनुमानावर देवेंद्राने वज्रप्रहार केला. त्यामुळे तो मूर्च्छित होऊन पडला. त्याला पाहून पवन देवांनी रागाने आपले काम थांबवले. सजीव सृष्टी हादरून गेली. सगळे देव त्यांना शरण आले. तेव्हा पवन देवांनी त्यांना अट घातली, 'माझ्या मुलाला शुद्धीवर आणा, तरच मी माझे कार्य पुन्हा सुरु करतो. 

देवेंद्राने हनुमंताला शुद्धीवर आणले आणि त्याच्यासकट सर्व देवांनी हनुमंताला आशीर्वाद आणि आपल्या जवळील विविध अस्त्र भेट म्हणून दिले. त्यामुळे बाल हनुमान सर्व शक्तिमान झाला होता. मात्र बाल वयात त्याला या शक्तीचा सदुपयोग कसा करावा हे माहीत नव्हते. तो खोडकर होता. त्याच्या खोड्यांमुळे सगळे त्रासले होते. विशेष म्हणजे ऋषी मुनी त्रस्त झाले होते. तेव्हा भृगु वंशातील ऋषींनी त्याला शाप दिला, 'हनुमंता तू तुझी शक्ती गमावून बसशील.' 

त्याच्या वतीने त्याच्या आई वडिलांनी माफी मागितली. तेव्हा ऋषींनी सांगितले, 'जेव्हा तुझ्या शक्तीची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा कोणी तुला त्या शक्तींची आठवण करून दिली तर या शक्ती परत मिळतील.' 

या आशिर्वादानुसार जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली आणि हनुमंताला आपल्या शक्तीची प्रचिती आली. 

म्हणून कठीण प्रसंगी कोणी गर्भ गळीत झाले असता, त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणे, या प्रसंगाची तुलना रामायणातल्या या प्रसंगाशी केली जाते.