शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मन शुद्ध झाले की, जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:40 IST

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते..!

- युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी( बीड, महाराष्ट्र , ८७ ९३ ०३ ०३ ०३ ) 

वासनेची शुद्धी झाल्यावरच मन शुद्ध होते. एकदा का मन शुद्ध झाले की, मनाने जे काही कर्म घडेल, ते ही शुद्धच होईल. मन शुद्धीसाठी सारासार विचार हा ही एक महत्वाचा टप्पा आहे. मन निर्विचारी तर राहूच शकत नाही. सतत विचार करीत राहणे हा तर मनाचा स्वभाव आहे पण हा विचार करतांना सार काय आणि असार काय..? हिताचे काय आणि अहिताचे काय..? याचा विवेक हवा. विचार करा पण कोणता करा..? तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात -

क्षणो क्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिंधू ।नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥

आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सारासार विचार करावा. कारण देह हा क्षणभंगूर आहे. आपण विचार करतो पण उद्धाराचा नाही, तर विषयाचा करतो. आपली बुद्धी विषय सुखाशिवाय इतर कशाचा विचार करावयास तयारच नसते. कारण -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ।धरुं जाता संग । तव तो होतो बाधक ॥

विषयसंग हाच तर आत्मज्ञानासाठी बाधक आहे. म्हणून विचारवंत लोकांच्या संगतीत (संतसंगतीत) जीवन घालविले तर विवेक प्राप्त होतो.

संत समागमी धरावी आवडी..!

माणसें प्रपंचाचा विचार करतात पण जो झालाच नाही त्याचा काय विचार करावयाचा..? हस्तामलक ग्रंथकार म्हणतात -

प्रपंच एक झाला होता । हें समूळचि मिथ्या वार्ता ।पुढे होईल मागुता । हें कल्पांती घडेना ॥

आपण म्हणाल, प्रपंच असार आहे, तो झालाच नाही तर मग आम्हांला प्रपंच दिसतो व भासतो कसा..? तुकोबा म्हणतात -

रज्जू सर्पाकार । भासियले जगडंबर ॥

दोरीच्या ठिकाणी भासणारा साप नाहिसा होण्यासाठी तो काठीने मारावा लागेल का हो..? अहो..! त्याठिकाणी प्रकाश आणला की - साप किंवा दोरी याचे योग्य ज्ञान होईल..! तेव्हा जीवाला जन्म ही नाही आणि मरण ही नाही. मूळ कूटस्थ..!त्याच्यावर अन्तःकरणाचा आश्रय केलेल्या कूटस्थाचा आभास आला की - त्यास जन्म म्हणतात व ते अन्तःकरण विस्कळीत होऊन आभासाचे भान नष्ट झाले की - त्यास मरण म्हणतात.आपण तर स्वभावतःच मुक्त आहोत याचा विवेक असणे म्हणजेच - मना अंतरी सार विचार राहो..!

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

तरी माया ऐसी व्याप्ती । नसतीच यया आथी ।का वांझेचि संतती । वानणें जैसे ॥

त्यामुळे अशी मिथ्या माया आणि तिच्यापासून झालेल्या मिथ्या संसाराचा विचार न करता सार विचार व असाराचा त्याग करावा असे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपणांस प्रतिपादन करतात.

॥ जय जय रघुवीर समर्थ  ॥

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक