शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

जेवणानंतर शतपावलीचे तसेच वामकुक्षीचे महत्त्व काय?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 27, 2020 16:38 IST

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो, त्याच्या देहात अनेक व्याधी उद्भवता, जो धावतो, त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजेच जेवणानंतर निष्क्रिय किंवा अतिसक्रीय होऊन चालणार नाही. त्यावर मंद पावले टाकीत शतपावली करणे, हाच एकमेव उपाय आहे. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

बालपणी जेवणाआधी, जेवताना, जेवणानंर आईच्या सूचना सुरूच असत. त्यावेळी जाचक वाटणाीऱ्या गोष्टी आयुष्यभरासाठी सुदृढ आरोग्याचा कानमंत्र होता, हे मोठेपणी लक्षात येते. बालपणीच चांगल्या सवयी अंगवळणी पडल्या, की आयुष्यभर आरोग्याची हेळसांड होत नाही. त्या सवयीतला मुख्य भाग जेवणाचा. जेवायच्या आधी हात धुवून ये, एक घास बत्तीस वेळा चावून खा, श्लोक म्हण, जेवताना बोलू नको, जेवताना पाणी पिऊ नको, जेवणाच्या ताटात अन्न टाकू नको, ताटाभोवतीची शिते जमीनिवर ठेवू नको, जेवणानंतर स्वच्छ चूळ भर, शतपावली कर, थोडी विश्रांती घे आणि मग पुढच्या कामाला लाग, या सूचनांचे आजही आपण शक्य तसे पालन करतो. वरील सूचनेतील प्रत्येक वाक्य, हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तुर्तास आपण शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व समजून घेऊ. 

हेही वाचा : अंघोळ झाल्यावर कपाळावर गंध लावण्याची प्रथा आहे, त्यामागील रहस्य काय आहे, बघा.

आपण आपल्या आजोबांना जेवणानंतर शतपावली मारताना पाहिले असेल. आजच्या काळात आपण त्याला नाईट वॉक म्हणतो, एवढाच काय तो फरक. परंतु, जेवणानंतर सावकाश पावले टाकत अन्न जिरवण्यासाठी चालण्याची क्रिया गरजेची आहे. म्हणून पूर्वीचे लोक त्याला रामरक्षेची, अथर्वशीर्षाची किंवा नातवंडांकडून परवचा म्हणवून घेण्याची जोड लावत. आता ती जागा मोबाईलवरील संवाद किंवा गाण्यांनी घेतली आहे.  एका श्लोकात म्हटले आहे,

भुक्तावोपविशत: स्थल्यं शयानस्य रुजस्तथा,आयुश्चक्रमाणस्य मृत्युर्धावति धावत: 

भोजन होताच जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो, तो प्रकृतीने स्थूल होतो. जो लगेच झोपतो, त्याच्या देहात अनेक व्याधी उद्भवता, जो धावतो, त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजेच जेवणानंतर निष्क्रिय किंवा अतिसक्रीय होऊन चालणार नाही. त्यावर मंद पावले टाकीत शतपावली करणे, हाच एकमेव उपाय आहे. 

शतपावलीमुळे पोटातील अन्न पचनशील होण्यास मदत होते. अन्नाचे नीट पचन झाले, तर नानाविध व्याधी जन्माला येण्याआधीच समूळ नष्ट होते. जेवून झाल्यावर एका जागी बसणे, लगेच झोपणे किंवा वेगाने काम करणे अपेक्षित नाही. तर शरीराची हालचाल होणे, महत्त्वाचे असते. चालणे, हा सर्वांगुसंदर व्यायाम मानला जाता़े  मात्र, जेवणानंतर प्रभातफेरीसारखी फेरी मारणे उपयोगाचे नाही. तिथे उपयोग फक्त शतपावलीचा. शतपावली म्हणजे काय, तर मोजून शंभरएक पावले चालणे. 

आजकाल दिवसभरात आपण किती चाललो, हे मोजणारे अ‍ॅप, घडयाळ आहेत. दिवसभराचा तोंडी हिशोब ठेवणे शक्य नसले, तरी जेवणानंतरची शतपावली करणे सहज शक्य असते आणि ती तेवढ्याच प्रमाणात करणे अपेक्षित असते. 

वामकुक्षीचे महत्त्व काय?जेवणानंतर आबाल-वृद्धांना आळस येतो. शाळा, महाविद्यालय, नोकरी किंवा उद्योग यातले कोणीही त्यात अपवाद नाहीत. म्हणून शास्त्राने वामकुक्षीचा पर्याय सुचवला आहे. परंतु, हा पर्याय घरी अनुसरता येतो. बाहेर असताना वामकुक्षी घेतली, तर हातात नारळ मिळायची शक्यता अधिक, अशा वेळी भोजन कमी घेणे ईष्ट!

परंतु, वामकुक्षीच का? वाम म्हणून शरीराची डावी बाजू. डावीच बाजू का? कारण जेवणानंतर, शतपावली झाल्यावर, वामकुक्षी घेतल्याने म्हणजे, डाव्या कुशीवर झोपल्याने जठरातील अन्न काही काळ जठरात राहते. ते तसे राहणे पथ्यकर असते. जठराच्या आकुंचन प्रसरण पावण्याने अन्न घुसळून निघते व व्यवस्थित पचते. दुसरे कारण म्हणजे, आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी व डाव्या नाकपुडीतून चंद्रनाडी वाहत असते. अन्नपचनासाठी सूर्यनाडीची क्रिया व्यवस्थित असावी लागते. डाव्या कुशीवर झोपल्यामुळे सूर्यनाडी मोकळी राहते आणि व्यवस्थित काम करते. म्हणून जेवण झाल्यावर वीस ते पंचवीस मीनिटे वामकुक्षी घेणे, महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते. 

हेही वाचा : उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?