शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

गोपीचंदन कशाला म्हणतात? त्यामागील आख्यायिका व लाभ कोणते ते जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 14:29 IST

गोपीचंदनाचा टिळा लावणाऱ्याला दररोज महानद्यांमध्ये स्नान केल्याचे आणि सर्व तीर्थक्षेत्र दर्शनाचे  पुण्य लाभते. 

भगवान विष्णूंची पूजा चंदन लेपनाशिवाय अपूर्ण मानली जाते. कारण विष्णूंच्या वर्णनात 'सर्वांगे हरिचंदनं सुललितं कण्ठे चा मुक्तावली' असे वर्णन आढळते. हे चंदन साधे नाही, तर गोपीचंदन लावण्याचा प्रघात आहे. ही प्रथा केव्हापासून रुजू झाली याबद्दल एक कथा सांगितली जाते- 

रुक्मिणी कृष्णाला विचारते, "आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही.असे का?" कृष्ण काहीही ऊत्तर देत नाही.

एकदा कृष्णाच्या छातीचा दाह होत असतो. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करुनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात.   रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. "आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही त्वरित अंमलात आणू."श्रीकृष्ण म्हणतात "जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा.मला बरं वाटेल."

महालातील आपल्या पायाची धूळ द्यायला सर्व जण नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते "मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ? माझी योग्यताच नाही. सात जन्म मी नरकात जाईन."

हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते.इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुक्मिणी सारखाच विचार करतात. आणि चरण रज राजवाड्यावर पोहचत नाही.दवंडी पिटणाऱ्यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एकजण गोकुळात जातो. दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात काय करायला लागेल ते सांगा !

एका घमेल्यात बारीक रेती आणलेली असते.त्यात उभे रहायचेआणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभुंच्या वक्षस्थळी लावू. 'माती तुडवणारा प्रभूंचा खरा  भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल. गोपी विचारतात रुक्मिणी मातेने  नाही केले?' 

दवंडीवाला सांगतो, "प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल" असं त्या म्हणाल्या. सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या  "जर  श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती  इकडे." आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.'

पुढे ही माती प्रभुंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो आणि आजही आयुर्वेदिक उपचार म्हणून गोपीचंदन लावायला सांगितले जाते. 

अशा गोपीचंदनचा महिमा काय आहे? महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ-

  • दररोज कपाळावर गोपीचंदनचा टिळक लावण्याचे पुण्य वर्णन करताना श्रीकृष्णाचे विधान आहे- जो प्रतिदिन आपल्या शरीरात गोपीचंदन टिळक लावतो, तो शेकडो पापांपासून मुक्त होतो आणि श्री हरिच्या गोलोकधामाकडे जातो.
  • कपाळावर गोपीचंदनचा टिळा रोज लावल्याने नराची नारायण होते. तसेच अशा व्यक्तीवर लक्ष्मीची कृपादृष्टी होते. 
  • मृत्यूच्या वेळी ज्याच्या बाहूवर, कपाळावर, अंतःकरणावर आणि डोक्यावर गोपीचंदन लावले जाते, तो लक्ष्मीपतीच्या जगात जातो.
  • ग्रह, राक्षस, पिशाच, यक्ष, साप आणि भूत इत्यादींचा दंश झाल्यास गोपीचंदन लावले जाते.
  • गोपीचंदनाचा टिळा लावणाऱ्याला दररोज महानद्यांमध्ये स्नान केल्याचे आणि सर्व तीर्थक्षेत्र दर्शनाचे  पुण्य लाभते.