शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

साधनेद्वारे ग्रहणशीलतेचा उत्तम काळ कोणता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 11:11 IST

आध्यात्मिक बनणे अतिशय सहज नैसर्गिक प्रक्रिया बनते. या कालावधीत केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.

तुम्हाला साधनापादाकडे घेऊन जाणार्‍या आणि हा मार्ग निवडलेल्या व्यक्तींच्या अनुभवांची ओळख आपल्याला या मालिकेमधील लेख आणि व्हिडिओंद्वारे होईल.आध्यात्मिक उन्नतीची वेळआध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणार्‍या लोकांसाठी ग्रीष्म ऋतु आणि मकर संक्रांतीदरम्यानचा काळ अतिशय महत्वाचा आहे. याला साधनापाद म्हणतात – जो ग्रहणशीलतेचा उत्तम काळ म्हणून ओळखला जातो. योग परंपरांमध्ये आणि विशेषतः उत्तर गोलार्धात, हा कालावधी साधनेसाठी अतिशय अनुकूल मानला जातो जेंव्हा आध्यात्मिक बनणे अतिशय सहज नैसर्गिक प्रक्रिया बनते. या कालावधीत केलेल्या साधनेचे सर्वोत्तम परिणाम प्राप्त होतात.सहजगत्या स्व-परिवर्तनाची वेळएखाद्या व्यक्तीला या जगात संपूर्णपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असणार्‍या अनेक गोष्टींपैकी, सर्वात महत्वाचे पैलू म्हणजे समतोल आणि स्पष्टता. एक संतुलित जीवन जगण्यासाठी केवळ बाह्य क्रिया-कलापांच्या व्यतिरिक्त अधिक काहीतरी आवश्यक असते, आपल्या आत काय घडते आहे हे सुद्धा महत्वाचे असते. साधनापाद हा एक असा काळ आहे ज्यात प्रत्येक व्यक्तीला तिचे मन आणि भावना स्थिर करून जीवनातील कोणत्याही परिस्थितीमधे सहाय्यक बनेल असा स्थिर आधारभूत पाया निर्माण करण्याची संधी असते.तीव्र साधनेचा काळ2018 मधे सद्गुरुंनी प्रथमच साधनापादाचा कालावधी ईशा योग केंद्राच्या पवित्र वातावरणात घालवण्याची संधी लोकांना उपलब्ध करून दिली. 21 देशांमधील 200 पेक्षा अधिक लोकांनी त्यांच्या आंतरिक परिवर्तनाकडे एकाग्रतेने, प्रयत्नपूर्वक प्रयत्न करण्यासाठी उपलब्ध असलेल्या या संधीचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सहभागी झालेल्या व्यक्ती अगदी तीव्र साधना करतात, ज्यामध्ये दैनंदिन योगक्रिया आणि स्वयंसेवेचा समावेश आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत आम्ही सहभागी झालेल्या व्यक्तींच्या आंतरिक प्रवासावर देखरेख ठेऊ आणि त्यांच्या अनुभवांचे आणि परिवर्तनाचे पडद्यामागचे अंतरंग समजावून घेऊ.