शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दिस येतील अन् जातील...शासनाने सांगितलेला उपाय उत्तम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 04:11 IST

पांडवांचासुद्धा एक वर्षाचा अज्ञातवास गेला. भीम स्वयंपाक्या, अर्जुन ब्रुहन्नडा झाला. तसं तुम्हाला व्हायचं नाही. पांडवाचं वर्ष गेलं. तुमचे महिने जातील.

- बा. भो. शास्त्रीअपाय हा स्वत:च्या चुकीने, प्रारब्धाने किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वांच्याच वाट्याला येत असतो. त्यावर आपण सर्वच उपाय शोधत असतो. खूप प्रयत्न करूनही यश आलं नाही तर हताश होतो. उपाय सापडत नाही. याचं दु:ख जगातल्या महापुरुषांच्या वाट्याला आलं आहे, ते त्यांना भोगावं लागलं; पण उपाय शोधून त्यांनी त्याचं निवारणही केलं आहे. कोरोनाने आपल्या जीवनावश्यक वस्तूंवर ताबा मिळविला आहे. त्याच वस्तू आपल्याविरोधात उभ्या आहेत. कोरोनाबाधित आपलीच भाजी, आपलीच फळं, जागेचा सात-बारा आपल्या नावावर; पण सत्ता त्याची. तिथं त्याचा स्पर्श ते आपल्याला अस्पृश्य झालं. वस्तूत दोष दिसला की, वैराग्य निर्माण होते. आता आपण थांबा व संयम ठेवावा. ‘दिस येतील, दिस जातील.’ पांडवांचासुद्धा एक वर्षाचा अज्ञातवास गेला. भीम स्वयंपाक्या, अर्जुन ब्रुहन्नडा झाला. तसं तुम्हाला व्हायचं नाही. पांडवाचं वर्ष गेलं. तुमचे महिने जातील. अंदमान येथे सावकरांची अकरा वर्षे गेली. तुम्हाला घरी सुरक्षित काही दिवस थांबायचं आहे. माणसं घरात कोंडली. तो स्वत:ला दुरुस्त करून घेताना दिसतो आहे. आमचा विसावा हेच निसर्गाचं आरोग्य. नद्या स्वच्छ करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणे हा उपाय चुकीचा होता. आपल्या विश्रांतीतच निसर्गाची श्रीमंती आम्हाला दिसली. तसं आपल्याला समर्थन करता येणार नाही हे खरं; पण मरणाची भीती हे जास्त खरं आहे, अशी विश्रांती नको आहे. आज देव मंदिरात बंद आहेत; पण आपलं हृदय बंद नाही. अनेक गोरगरीब उपाशी मरताना दिसतात. त्यांना थोडीशी मदत करू शकतो. हाच देवाचा धर्म आहे. मंदिराची संपत्ती दान करणं हा मंदिराचा धर्म आहे. संत-महंतांना मिळालेला पैसा गरिबांना वाटणं हा त्यांचा धर्म आहे. उपाय नाही असं कसं शक्य आहे. रायगडावरून खाली जाण्याचे उपाय संपल्यावर हिरकणी अंधारात कडा उतरते. तिला कसा उपाय सापडला. आम्हाला शासनाने घरात राहाणे हा उपाय सांगितला आहे, तो उत्तम आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या