शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांसाठी पतित पावन मंदिर उभारणारे अन् त्यांच्याच हस्ते मूर्तीस्थापना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 08:00 IST

'तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू' हा नारा देत त्यांनी पतित पावन मंदिराच्या छताखाली सर्व जातिबांधवांना संघटित केले. बहुजनांना केवळ मंदिरात नव्हे तर थेट गाभाऱ्यापर्यंत जाण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. 

ठळक मुद्देबहुजनांच्या हातून मूर्तीस्थापना करवून घेण्याची ही देशातील पहिली घटना होती. या बातमीची दखल लंडनच्या वृत्तपत्रानेदेखील घेतली होती.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका नेमकी काय होती, हे आजतागायत ना हिंदू समजू शकले, ना हिंदूएतर! ही स्थिती आजचीच नाही, तर ते हयातीत असल्यापासूनची आहे. परंतु, सावरकरांनी कधीच आपल्या भूमिकांबाबत स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवला नाही. ते नेहमी म्हणत, 'माझे विचार पटायला लोकांना वेळ लागेल, पण पटतील हे नक्की!' हा आत्मविश्वास आणि द्रष्टेपण त्यांना प्राप्त झाले, ते त्यांच्या ठायी असलेल्या आध्यात्मिक बैठकीतून!

याच प्रेरणेतून त्यांनी १९३० रोजी रत्नागिरी येथे मुक्कामी असताना बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून स्वतंत्र मंदिर उभारले. भगोजी शेठ किर या सद्गृहस्थांच्या मदतीने रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर उभारले. भागोजी शेठ किर यांनी २० गुंठे जमीन विकत घेऊन त्या काळात दीड लाख रुपये खर्चून मंदिराचे काम पूर्ण केले होते. त्या मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश होता. मंदिरातील लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सावरकरांनी किर दाम्पत्यांच्या हातून करवून घेतली. बहुजनांच्या हातून मूर्तीस्थापना करवून घेण्याची ही देशातील पहिली घटना होती. या बातमीची दखल लंडनच्या वृत्तपत्रानेदेखील घेतली होती.  सावरकरांच्या या निर्णयामुळे त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. परंतु, सावरकरांनी लोकांकडे दुर्लक्ष केले आणि मंदिर निर्मितीचे औचित्य साधून बहुजनांसोबत सहभोजन केले होते. 

'तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधू बंधू' हा नारा देत त्यांनी पतित पावन मंदिराच्या छताखाली सर्व जातिबांधवांना संघटित केले. बहुजनांना केवळ मंदिरात नव्हे तर थेट गाभाऱ्यापर्यंत जाण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतभूमीसाठी आणि भारतीयांसाठी दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगूनही त्यांच्या वाट्याला कायम उपेक्षाच आली. परंतु, त्यांनी याबद्दल कधीच तक्रार केली नाही. त्यांनी आपले कार्य आणि आपला देह देव, देश, धर्मासाठी वाहून घेतला. याच कार्याचा गौरव करण्यासाठी पतित पावन मंदिरात खुद्द लक्ष्मी नारायण त्यांच्या कार्याची साक्ष ठेवून आहेत. आणि काय हवे...?