शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आपुलिया हिता जो असे जागता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:47 IST

असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।

  आपले कल्याण आपल्या हाती  आहे. मानवी जीवनामध्ये हे सर्व काही पुन्हा मिळवता येईल. परंतु मानवी जीवन पुन्हा मिळवू  शकत नाही म्हणून सर्वार्थाने सर्वात मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ते आपले मानवी जीवन आहे.   आपल्या जीवनाला जर सुरक्षित व व्यवस्थित टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टीची मर्यादा, काही गोष्टी चे नियम शिस्त बंधन पाळणे गरजेचे आहे.  आज सर्व जगाला कोरोना या महाभयंकर रोगाने ग्रासले आहे.याचे कारणच मुळी माणसाचे बदलली मनस्थिती व खान पान परिस्थिती बदलली आहे. ती सुधारण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीने पूर्वापार चालत आलेल्या  यम, नियम, योग, प्रत्याहार समाधी या सगळ्या  अष्टांग योग गोष्टीचा अंगीकार केलेला आहे. असे आपणास पहावयास मिळतो. आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की, जो कोणी याचा अंगीकार करणार नाही तो नेस्तनाबूत होणार.  म्हणूनच आज  आपले स्वहित कशामध्ये आहे ते जाणण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर माणसाचे जीवन संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे.संत तुकाराम या अनुषंगाने म्हणतातआपुलिया होता जो असे जागता ।धन्य माता पिता जयाचिया।आपले हिट क्षमध्ये आहे हे ज्यांना कळले त्यांचे आईबाप धन्य आहेत. त्यांची मुलं जबाबदार आहेत समजदार आहेत. नाहीतर सर्व कुळाचाही नाश होऊ शकतो. अशी परिस्थिती आज एक कोरोना विषाणू ने माणसावर आणली आहे.माणसाने आपल्याला, आपल्या जीवनाला सुरक्षित करण्यासाठी आपण संतांचा विचार अंगीकारावा. जेणेकरून आपले जीवन हे अधिक मौल्यवान होईल. नाहीतर सर्वकाही संपून जाईल. संत तुकाराम महाराज म्हणतात जग हे दिल्या घेतल्याचे आहे- जन हे दिल्या घेतल्याचे। अंत काळाचे कुणी नाही ।। म्हणून अनंत काळाचे मित्र कोणीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपली आपण करा सोडवन संसार बंधन सोडा वेगीं।असे ज्ञानोबा माऊली सांगतात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा संतांचा विचारा संसाराला आधिक सुखी करण्यासाठी समाधानी करण्यासाठी शांततेने जगण्यासाठी अधिक उपयुक्त  आहे. म्हणून सर्वांनी हे जग सुंदर करण्यासाठी आपल्या वागण्याची, बोलण्याची, रहाण्याची, खाण्याची, पिण्याची तऱ्हा, पद्धती बदलणे आवश्यक आहे. नाहीतर मग यम, नियम,आहार, प्रत्याहार,  समाधी  या मुनी पतंजली यांच्या अष्टांग योगाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे .संतांच्या मते अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।आपली काळजी जे लोक जीव धोक्यात घालून घेत आहेत. त्यांची काळजी कमी करण्यासाठी आपण घरीच राहून देशहितासाठी नियम पाळणे आवश्यक आहे.  -डॉ. हरिदास आखरे, शेगाव

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक