शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मंगलाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 04:26 IST

- इंद्रजित देशमुख खल प्रवृत्ती म्हणजे परदु:खे सुखी. दुसऱ्याच्या दु:खाने जो सुखी होतो, त्याची प्रवृत्ती अंधारलेली असते. खल प्रवृत्तीने जगणारे ...

- इंद्रजित देशमुखखल प्रवृत्ती म्हणजे परदु:खे सुखी. दुसऱ्याच्या दु:खाने जो सुखी होतो, त्याची प्रवृत्ती अंधारलेली असते. खल प्रवृत्तीने जगणारे लोक आईतखाऊ, आपमतलबी, अप्पलपोटी, आळशी असतात. जगाची व्यवस्थाच निसर्गाने अशी केली आहे की, परस्परविरोधी गुणांची माणसे त्याने तयार केली आहेत. प्रत्येक प्रकारचा नमुना इथे अस्तित्वात आहे. ज्याला या सभोवतालच्या विविधतेचा अंदाज येतो, तो आपले जगणे त्याप्रमाणे घडवत जातो. परसुखे सुखी व परदु:खे सुखी यांपैकी परदु:खे सुखी ही माणसे खूपच विक्षिप्त असतात. यांच्याशी कसे वागावे हे कळत नाही. अशा प्रकारची माणसे क्षुल्लक कारणावरून चिडत असतात, कांगावा करीत असतात, कुणाची भीडभाड ठेवत नाहीत. पायरी सोडून बडबडत राहणं हा त्यांचा स्वभाव असतो. सोशल मीडियावर जो सध्या ब्लेम गेम सुरू आहे; राजकारण्यांचा, अनेक विचारांच्या अनुयायांचा, त्यांच्या आयटी सेलमधील तथाकथित विचारवंतांचा, तो विकृतीने पछाडलेला आहे. माझं तेच खरं आणि माझ्या विचाराशिवाय वा विचाराला विरोध असेल त्यांना अस्तित्वच नाही. त्यांना अशा शब्दांत ठोकले जाते की, आमच्या संगोपनात व सहयोगी सहजीवनात ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध यांची पेरणी चुकली आहे का? आनंद पेरणारी सहअस्तित्व, सहयोगी सहजीवन, द्वेषमुक्त गावकी, भावकी व समाज कधी येथे नांदू शकेल की नाही, असे वाटते; पण प्रचंड आशावादी राहून, ज्यांची मांगल्यावर श्रद्धा आहे, त्यांनी मंगलाची-सुंदराची पेरणी करतच राहायला हवे. उद्याच्या सुदृढ पुनर्निर्माणासाठी हजारो काजव्यांच्या प्रकाशात काळरात्र संपवून उद्याचा सूर्य सारे काही प्रकाशमान करेल. त्याचसाठी पीयूषाचा सागर होऊन, प्रतिभेच रूप घेऊन, शब्दांना साधन बनवून बरसत राहूया.