शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

Som Pradosh 2025: तुमच्याही देवघरात शिवलिंग असेल तर टाळा 'या' चुका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 07:00 IST

Som Pradosh 2025: आज सोम प्रदोष आणि जोडूनच शिवरात्र येत आहे, त्यानिमित्ताने शिव पूजेबरोबरच जाणून घ्या शिवलिंगाशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टी!

देवघरात मोजकेच देव ठेवावेत हे आपण जाणतो. त्यात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता ही माहेरून मिळालेली असल्याने तिचा देवघरात समावेश असतोच, शिवाय गणपती, दत्तगुरु किंवा स्वामी, शंकराची पिंडी या पंचदेवतांचा मुख्यत्त्वे समावेश असावा असे शास्त्र सांगते. प्रामुख्याने गणेश, देवी, सूर्य, विष्णू आणि शिव हे पंचायतन पूजन शास्त्राला अभिप्रेत आहे. अशातच महादेवाचे शिवलिंग ठेवण्याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो, त्याबद्दल जाणून घेऊ. 

देवघरात महादेवाची प्रतिमा ठेवू नये असे शास्त्र सांगते, मात्र शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही. महादेव हे बैरागी असले तरी ते कुटुंबवत्सल आहेत. त्यांच्याप्रमाणे आपलाही संसार सुखाचा व्हावा यासाठी त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरतो. म्हणून देवघरात शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही. फक्त त्याच्याशी संबंधित काही नियमांचे आवर्जून पालन करावे आणि शुचिर्भूतता राखावी. 

शिवलिंग ठेवण्याबाबतचे नियम आणि योग्य दिशा: 

>> घरात सोमवारी किंवा श्रावणात रुद्राभिषेक करत असाल तर शिवलिंगावर नाग आणि समोर नंदी ठेवू नये. 

>> इतर वेळी शिवलिंगावर नाग असलेली पिंडी देवघरात ठेवण्यास काहीच हरकत नाही. पुढे नंदी महाराज असतील तरीही उत्तमच!

>> शिवलिंगाची निमुळती बाजू जिला वाहिनी असे म्हणतो, ती उत्तर दिशेला हवी. 

>> शिवलिंगाची पूजा करताना त्याला भस्मलेपन करावे, कुंकू लावू नये. पांढरी फुले आणि बेल वाहावे. 

>> शिवलिंगाला गंधलेपन करताना अनामिका, मध्यमा आणि तर्जनीचा एकत्रित वापर करावा. 

>> अशी शेवटची तीन बोटं एकत्रित ओढल्याने तयार होणाऱ्या गंधाला त्रिपुंड असे म्हणतात. ते चंदन किंवा भस्माने लावले जाते. 

>> देवघरात शिवलिंग नसेल तर रुद्राक्षावरही अभिषेक करता येतो. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधी