Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य, नियमित, दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्यापरिने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. (Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra) पण या तारक मंत्राचा नेमका अर्थ काय? तारक मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कोणती? तारक मंत्र म्हणण्याचे फायदे अन् लाभ जाणून घेऊया...
‘तारक मंत्र’ या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. तारक मंत्र स्वरुपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू, संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे की ‘अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी’, फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा. त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, असेही स्वामी भक्त, उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखांतून संरक्षण आणि आधार प्रदान करतो, असे मानले जाते.
स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र अन् तारक मंत्राचा अर्थ
निःशंक हो, निर्भय हो, मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामीअशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून कायस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही मायआज्ञेविणा काळ ना नेई त्यालापरलोकही ना भिती तयाला ।।२।।
उगाची भीतोसी भय पळू देजवळी उभी स्वामी शक्ती कळू देजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचानको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रद्धेसहितकसा होशी त्यावीण तू स्वामीभक्तकितीदा दिला बोल त्यांनीच हातनको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वमीच या पंच प्राणाभृतातहे तिर्थ घे, आठवी रे प्रचितीन सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना: या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो.
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना: या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की, श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते.
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी: या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे.
अशक्य ही शक्य करतील स्वामी: या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की, श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात.
जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय: या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे.
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय: या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे.
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला: या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की, श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही.
परलोकी ही ना भीती तयाला: या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही.
उगाची भीतोसी भय हे पळू दे: या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळू दे: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे.
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे.
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिला आहे.
खरा होई जागा श्रद्धेसहित: या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा, प्रामाणिक राहण्याचा, स्वामींवरील निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त: या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामीभक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे.
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे.
नको डगमगू स्वामी देतील हात: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिला आहे.
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ: या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे.
स्वमीच या पंच प्राणाभृतात: या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे.
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे.
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती: या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे कालातीत लाभ
या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच “निशंक हो निर्भय हो मना रे” असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठणाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. या मंत्रात म्हटले आहेस ना “अशक्य ही शक्य करतील स्वामी” त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी, कमतरता भासत नाही. सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते. या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र कधी म्हणावा? स्वामींच्या तारक मंत्राचे पठण कसे करावे?
तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर करावे. आजच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या काळात सकाळी शक्य नसेल, तर प्रदोष काळी म्हणजेच तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी हा मंत्र म्हणावा. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. स्वामींचा तारक मंत्र दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. किमान एकदा आणि कमाल जितक्या वेळा शक्य असेल, तितक्या वेळा स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. १०८ वेळा म्हटला तर सर्वोत्तम. दररोज शक्य नसले तरी एखाद्या गुरुवारी १०८ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करून पाहावा. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र, काही लोकांना काही दिवसांतच याचे फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र, मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र, तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ वापरणे शुभ मानले जाते. या प्रकारातील माळ तुमच्याकडे नसली तरी काळजी करू नका. तुम्ही जी माळ घेऊन नियमित जप करता, ती वापरून हा जप केला तरी चालेल. स्वामी सेवा आणि भाव महत्त्वाचा आहे.
संपूर्ण तारक मंत्र नियमित म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळी काय करावे? काळजी सोडाच, अगदी सोप्पा मार्ग आहे
मन कितीही उद्विग्न असू दे, पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते, हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का? तर नाही! हा मंत्र दररोज म्हणायला हवा तोही १०८ वेळेला! संपूर्ण तारक मंत्र १०८ वेळेला म्हणणे शक्य नाही, अशा वेळेस त्यातील दोनच ओळी १०८ वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल. नामाची, नामस्मरणाची गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करवून घ्यावा लागेल. एक-दोनदा नाम घेऊन ती सवय लागणार नाही. त्यासाठी १०८ वेळा जप करा म्हटले आहे. एवढ्या वेळा नामःस्मरण करू तेव्हा कुठे एकदा मन नामाशी एकरूप होईल. बाकीचे १०७ विरून जातील पण ते १ नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल.
‘नि:शंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!’
या दोन ओळीच का? तर या ओळींच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे. अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते...प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे! स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही. उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी, एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते. म्हणून ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते. म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रात:काळची असावी असे सुचवले आहे. त्यावेळी मनात शून्य विचार असतात. आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरु असते. हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते. अशा वेळी उठून आसन घालून, स्वामींची प्रतिमा समोर ठेवून, उदबत्ती लावून नामजप सुरु केलात तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल. मन शांत, आरोग्य स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊ लागेल. मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईलच असे नाही. उपासनेत बंधने नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केलात तरी त्याचा लाभ होईल.
स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणारा आहे. जर घरात कोणाचे आजारपण असेल, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नांतून वाट मिळेल. एवढे नामजपात सामर्थ्य आहे. तारक मंत्रामध्येही अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करते. असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी उर्जा तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे, जे भक्तीने पठण करतात, ते सर्व व्याधीतून मुक्त होतात. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणार्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो.
।। श्री स्वामी समर्थ ।।